RCB vs PBKS IPL 2024 : होम ग्राऊंडच ठरतंय आरसीबीसाठी अडचण, यंदाचा हंगाम तरी ठरणार का अपवाद?

आरसीबीच्या घरच्या मैदानावरील आव्हान - जिंकण्याची परंपरा बदलणार का?
RCB vs PBKS
RCB vs PBKS esakal

RCB vs PBKS IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सहावा सामना हा रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. या दोन्ही संघांनी एक-एक सामने खेळला आहे. बंगळुरूला चेन्नईविरूद्ध पराभव सहन करावा लागला होता. तर पंजाब किंग्जने दिल्लीचा पराभव करत विजयाचे खाते उघडले आहे. आरसीबी आजचा सामना आपलं होम ग्राऊंड चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे. मात्र आरसीबीला होम ग्राऊंडचा फायदा होईल अशी खात्री नाही.

आरसीबीचे चिन्नास्वामी स्टेडियमवरील विनिंग पर्सेंटेज हे 46.51 टक्के इतके आहे. ते आयपीएलमधील इतर संघांच्या होम ग्राऊंडवरील कामगिरीच्या तुलनेत फार कमी आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यासारख्या संघांचे होम ग्राऊंडवरील विनिंग पर्सेंटेज हे 60 टक्क्याच्या वर आहे.

RCB vs PBKS
IPL 2024, RR vs LSG: '...तर मी इथं नसतो, तोच खरा सामनावीर', राजस्थानच्या संजूनं कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

चिन्नास्वामी फलंदाजीला पोषक

इतर संघाप्रमाणे होम ग्राऊंडवर जास्तीजास्त सामने जिंकण्याची रणनिती आरसीबीला लागू पडत नाही. कारण आरसीबीला चिन्नास्वामीवरील फलंदाजीला पोषक खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलता आलेला नाही. शॉर्ट बाऊंड्रीमुळे देखील हे ग्राऊंड हाय स्कोरिंग झालं आहे. इथे वेगवान गोलंदाजांना देखील संघर्ष करावा लागतो.

युझवेंद्र चहल हा उच्च दर्जाचा लेग स्पिनर आहे. तो आरसीबीचा चिन्नास्वामीवर सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाज होता. त्याने फक्त 51 विकेट्स घेतल्या आहेत. त्यावरून चिन्नास्वामीवर गोलंदाजी करणे किती अवघड आहे हे दिसून येते.

गोलंदाजीत आरसीबी कमी पडते

आरसीबीचा गोलंदाजी विभाग हा कायम दबावाखाली असतो. त्यांच्याकडे अशा प्रकारच्या खेळपट्टीवर चांगला मारा करणारे गोलंदाज कमी आहेत. मिस्ट्री स्पिनर किंवा 150 kmpl पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आरसीबीकडे फारसे नाहीत. आरसीबीकडे मिचेल स्टार्क सारखे गोलंदाज होते. मात्र अशा गोलंदाजांमध्ये सातत्य राहिलं नाही.

RCB vs PBKS
Fact Check GT vs MI : पांड्या-रोहितच्या फॅनमध्ये झाली हाणामारी? काय आहे Viral Video मागील सत्य?

यंदाच्या हंगामात तरी आरसीबी लक्ष देणार?

यंदाच्या हंगामात आरसीबीने गोलंदाजीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकी फर्ग्युसन आणि अल्झारी जोसेफ या दोन वेगवान गोलंदाजांना आपल्या संघात घेतलं आहे. मात्र चिन्नास्वामीवर यशस्वी होण्यासाठी त्यांना गोलंदाजीत सातत्य आणि नियंत्रण राखणं गरजेचं आहे.

होम ग्राऊंडवर जिंकणं महत्वाचं

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्या यशाचं रहस्य हे त्यांची होम ग्राऊंडवरील दमदार कामगिरी हे आहे. ते प्रत्येक हंगामात होम ग्राऊंडवर निदान 5 सामने तरी जिंकतात. त्यामुळे त्यांना प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी फक्त तीन अवे सामने जिंकणे गरजेचे असते. अशा प्रकारची रणनिती आरसीबीला देखील आखणे गरजेचे आहे. तरच ते आयपीएल टायटल जिंकू शकतात.

(IPL News Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com