वर्तन आणि मानसिक आरोग्य
वर्तन आणि मानसिक आरोग्यEsakal

Mental Health: तुमच्या वर्तनाचे मानसिकतेवरही होतात परिणाम?

वर्तणुकीशी संबंधित विकार हे स्वतःला आणि सभोवतालच्या लोकांना त्रास देणारे आणि हानिकारक असणाऱ्या वर्तनांचे प्रकार असतात. या विकारांचे निदान आणि उपचार लहानपणापासूनच करावे लागतात

वर्तणुकीशी संबंधित विकार हे स्वतःला आणि सभोवतालच्या लोकांना त्रास देणारे आणि हानिकारक असणाऱ्या वर्तनांचे प्रकार असतात. या विकारांचे निदान आणि उपचार लहानपणापासूनच करावे लागतात, परंतु उपचार न केल्यास ते व्यक्तीच्या प्रौढ जीवनात विकोपाला जाऊ शकतात.

मनुष्याला ‘सामाजिक प्राणी’ म्हणून संबोधले जाते. प्रत्येक मनुष्य आणि त्याचे कुटुंब Family हे समाजाचे घटक असतात; मनुष्याने समाजात कसे राहावे, कुटुंबीयांसह इतरांशी कसे वागावे, बोलावे आणि त्याने स्वतःच्या वर्तणुकीबाबत Behavior काय दक्षता घ्यावी, याबाबत काही लिखित किंवा अलिखित/ संकेत स्वरूपातले नियम मानलेले असतात. health tips marathi mental health and Behavioral disorders

एखाद्या व्यक्तीचे सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक बाबतीतले वर्तन जर समाजाला त्रासदायक ठरत असेल; ते अनावश्यकरीत्या आक्रमक किंवा इतरांच्या नित्य व्यवहारांमध्ये व्यत्यय आणणारे असेल तर त्याला वर्तणूक विकार किंवा बिहेविअरल प्रॉब्लेम्स म्हणतात.

हे वर्तन सामाजिक नियमांचे किंवा समाजाकडून कोणत्याही व्यक्तीबाबत असलेल्या अपेक्षांचे उल्लंघन करणारे असते. या वागण्यातून त्या व्यक्तीचे स्वतःचे वैयक्तिक स्वास्थ्य गंभीरपणे बिघडत नसले, तरी तो एक मानसिक आजारच Mental Illnessअसतो.

वर्तणुकीशी संबंधित विकारांमध्ये शाळेत, घरात, कार्यालयात आणि सामाजिक परिस्थितीत समस्या निर्माण होतात. वर्तणूक विकार मुलांमध्ये होतात तसेच प्रौढांमध्येही होतात. वर्तन विकार बऱ्याचदा गंभीर स्वरूप धारण करू शकतात. बालपणात उपचार न केल्यास, हे विकार एखाद्या व्यक्तीच्या नोकरी आणि नातेसंबंध टिकवून ठेवण्याच्या क्षमतेवर आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम घडवतात.

खरे तर लहानपणापासूनच या विकारांचे निदान व्हायला हवे. पण तसे होत नाही. अनेकदा कुटुंबातील किंवा समाजातील एखाद्या व्यक्तीमधील वर्तणूक विकारांच्या लक्षणांबद्दल आपल्याला काळजी वाटते, काहीवेळा रागही येतो. समाजात वावरताना आजूबाजूला वर्तणूक विकारांची अशी चिन्हे नजरेस येतात.

त्यांचा समाजातील प्रत्येक व्यक्तीवर काही ना काही परिणाम होताना आढळून येत आहे. त्यामुळे वर्तणुकीशी संबंधित विकारांची लक्षणे, चिन्हे काय असतात आणि त्यांच्यावर उपचार कसे करतात, याबाबत प्राथमिक जाणीव असणे सर्वांसाठी आवश्यक ठरते.


हे देखिल वाचा-

वर्तन आणि मानसिक आरोग्य
सारखी चक्कर येते? मग नका करु दुर्लक्ष...'हे' असू शकतं कारण!

मानसिक आरोग्य आणि वर्तणूक आरोग्य

मानसिक आरोग्य आणि वर्तणूक आरोग्य या दोन्ही संकल्पना एकमेकांशी जोडलेल्या असल्या, तरी त्यात स्वाभाविकपणे काही फरकही आहेत.

वर्तणूक आरोग्य म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन सवयी आणि वर्तन. या सवयींचा त्याच्या स्वतःच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर चांगले-वाईट परिणाम होत असतात. त्यामध्ये शारीरिक आरोग्याबाबत आवश्यक असलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी, वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी, आरोग्याशी संबंधित काही प्राधान्ये आणि निवडींचा समावेश होतो.

वर्तनामधील सर्व सवयींबाबत समतोल असावा लागतो. यामध्ये व्यायाम करणे, निरोगी खाणे, वेळेवर झोपणे अशा सवयींनी मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे संतुलन राखले जाते.

मानसिक आरोग्य हे व्यापक प्रमाणातल्या वर्तणुकीशी संबंधित आरोग्यछत्राचा एक भाग असतो. त्यातून त्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीची कल्पना येऊ शकते. मानसिक आरोग्यात ती व्यक्ती कशी वागते, तिला काय वाटते, काय जाणवते आणि ती एखाद्या गोष्टीला कसा प्रतिसाद देते याला महत्त्व असते.

वर्तणुकीशी संबंधित विकारांची भावनिक लक्षणे

• कोणत्याही घटनेत लगेच निराश किंवा चिंताग्रस्त होणे
• सतत राग येणे
• आपले दोष इतरांवर टाकणे
• नियमांचे पालन करण्यास नकार देणे किंवा नियम बनवणाऱ्यांच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित करणे
• वाद घालणे आणि इतरांना चीड आणणे
• निराशा हाताळण्यात अडचण येणे
• निष्काळजीपणा
• अतिक्रियाशीलता
• आवेग
• इतरांना अपमानास्पद वागणूक देणे
• नशेच्या पदार्थांचा किंवा औषधांचा वापर करणे
• गुन्हेगारी वृत्ती बाळगणे

वर्तणूक विकार- वैद्यकीयदृष्ट्या वर्तणूक विकारांसंबंधित आजारांमध्ये समाविष्ट असलेले काही आजार म्हणजे-

• अटेन्शन-डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी)
• अपोझिशनल डिफिएन्ट डिसऑर्डर (ओडीडी)
• आचरण विकार
• ऑब्सेसिव्ह-कम्पल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी)
• चिंता विकार आणि त्यासंबंधित पॅनिक डिसऑर्डर
• व्यत्यय आणणारे वर्तन विकार
• भावनिक विकार

वर्तणुकीशी संबंधित विकार हे स्वतःला आणि सभोवतालच्या लोकांना त्रास देणारे आणि हानिकारक असणाऱ्या वर्तनांचे प्रकार असतात. या विकारांचे निदान आणि उपचार लहानपणापासूनच करावे लागतात, परंतु उपचार न केल्यास ते व्यक्तीच्या प्रौढ जीवनात विकोपाला जाऊ शकतात.

परिणामतः अशा व्यक्तींना निकोप नातेसंबंध ठेवणे, नोकरी, व्यवसाय-धंदा आणि आणि इतर कार्ये सहजगत्या करणे दुर्धर ठरते.

हे देखिल वाचा-

वर्तन आणि मानसिक आरोग्य
हातातला Mobile आणि समोरचा Computer केव्हा बंद करायचा याचं हवं भान!

कारणे- वर्तन विकार काही जोखीम घटकांमुळे (रिस्क फॅक्टर) निर्माण होतात. त्यामध्ये-
• बालपणात अमली किंवा मादक पदार्थांचा गैरवापर
• आत्मसन्मानाचा अभाव
• पालकांमधील व्यसनाधीनता
• लहानपणात पालकांच्या देखरेखीचा अभाव
• पूर्वायुष्यातील क्लेशदायक घटना
• लहानपणी विषारी (टॉक्सिक) वस्तूंच्या संपर्कात येणे
• पालकांशी भावनिक संबंध नसणे
• वर्तन विकार असलेल्या समवयस्कांशी संबंध असणे

वर्तणुकीसंबधात अनेक दोष वर्तन विकार म्हणून ओळखले जातात, सबब सर्वात जास्त आढळणाऱ्या काही विकारांची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे.

१. सामाजिक आचारांसंबंधित विकार (कंडक्ट डिसऑर्डर)

आचार विकारामध्ये म्हणजे सामाजिक वर्तणुकीशी आणि भावनिक समस्यांशी संबंधित वर्तन येते. यामध्ये स्वतःव्यतिरिक्त इतरांना कमी लेखले जाते. सामाजिक, नैतिक नियमांचे पालन करणे आणि समाजमान्य पद्धतीने वागणे या व्यक्तींना जड जाते. त्यांचे वर्तन सर्वांशी शत्रुत्वाचे, शारीरिकदृष्ट्या हिंसक तसेच समाजविरोधी असू शकते. या विकाराची चिन्हे मुलांमध्ये

साधारणपणे वयाच्या १६व्या वर्षाच्या आसपास दिसतात. त्यात-
• सतत मारामाऱ्या आणि भांडणे करणे
• समवयस्कांना छळण्यात, त्रास देण्यात किंवा धमकावण्यात आनंद वाटणे
• चोऱ्या करणे
• इतरांच्या खासगी मालमत्तेचा नाश करणे, तोडफोड करणे

या व्यक्तींना आपण केलेल्या वर्तनाबद्दल किंवा कृत्याबद्दल पश्चात्ताप होत नाही, आपले काहीतरी चुकतेय अशी काळजी वाटत नाही, इतरांना त्रास देताना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही, आपण केलेल्या कृत्यांबाबत त्यांच्याकडून कोणताही भावनिक प्रतिसाद नसतो.

२. ऑपोझिशनल डिफायंट डिसऑर्डर (ओडीडी)

मुले लहान वयात स्वाभाविकपणे उर्मटपणे बोलतात, उद्धट वागतात, इतरांची अवहेलना करतात, सतत चिडचिड करतात. पण ती मोठी झाल्यावरही असे वर्तन होत राहिल्यास, त्याला ऑपोझिशनल डिफायंट डिसऑर्डर म्हणतात.

बालपणात सुरू होणाऱ्या या विकारात, इतरांच्या अधिकाराबद्दल वारंवार प्रश्न करणे, सतत वाद घालणे, शिस्तीत आणि शांततेत वागणे नाकारणे, इतरांना त्रास होईल किंवा अस्वस्थ वाटेल असे वर्तन हेतुपुरस्सर सदोदित करणे असे वर्तन आढळून येते.

‘जाऊ दे लहान आहे’ असे समजून या विकाराचे निदान आणि उपचार लहान वयात केले जात नाही. परिणामतः पुढील आयुष्यात सर्व जगाचा रागराग करणे, आपल्याबाबत सगळे गैरसमजच करून घेतात असे वाटणे, नोकरी-धंद्यात अधिकारी व्यक्तींबाबत सतत नापसंती दाखवणे, आपल्याला विरोध करणारा अहवाल किंवा अभिप्राय सादर केल्यावर बचावात्मक बनणे आणि दोषाचे खापर इतरांवर फोडणे असे प्रकार घडतात.

३. अटेंशन डेफिसिट हायपर-अॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी)

लहान मुले, किशोरवयीन, तरुण आणि प्रौढांमध्ये सर्वात जास्त आढळणाऱ्या वर्तन विकारांमध्ये मोडतो.

चिन्हे आणि लक्षणे

• कमालीचे भावनाविवश होऊन आवेग व्यक्त करणे
• कोणत्याही बाबतीत समोर घडणाऱ्या गोष्टींकडे पूर्ण लक्ष देण्यात असमर्थ असणे
• कोणत्याही कामाच्या वेळा पाळण्यास असमर्थ असणे, वेळेचे योग्य नियोजन करता न येणे
• स्वभाव अत्यंत लहरी असणे
• छोट्या छोट्या गोष्टीत निराश होणे
• जीवनातील ताणतणावाचा सामना करण्यात अडचणी येणे

या लक्षणांमुळे आर्थिक अस्थिरता, बेरोजगारी, कायद्याची अंमलबजावणी करताना वारंवार त्रास होणे, नशील्या पदार्थाचा गैरवापर आणि वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक संबंधात अस्थिरता येणे, यासारख्या गुंतागुंतीच्या समस्या उभ्या राहतात.

हे देखिल वाचा-

वर्तन आणि मानसिक आरोग्य
Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

४. ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी)

हा विकार असलेली व्यक्ती सतत कसल्या ना कसल्या काळजीत आकंठ बुडलेली असते. दीर्घकाळ मनात साचलेल्या, अनियंत्रित आणि अनाहूत गोष्टी, त्या व्यक्तीच्या विचारातून, कृतीतून आणि आवेगातून व्यक्त होत असतात.

या विकाराने बाधित व्यक्ती, सतत हात धुणे, घराची सतत साफसफाई करणे, बोलताना वाक्यांची किंवा प्रार्थनांची सारखी पुनरावृत्ती करत राहणे, कठोर दिनचर्या पाळणे. एखादी गोष्ट वारंवार मोजणे आणि तपासणे अशा वर्तन दोषात सापडलेली आढळते.

अशा व्यक्तींना जंतूंबद्दल लक्षणीय भीती किंवा काळजी वाटत राहते, त्यामुळे संभाव्य जंतूपासून मुक्त राहण्यासाठी सतत जंतुनाशकाने ते हात धूत राहतात. त्यामुळे त्यांच्या हातांना भेगा दिसतात, त्यावर फोड आलेले असू शकतात आणि ते राठ बनतात. त्यांच्या बाबत खालील विपरीत बाबी आढळून येतात-

• कोणत्याही घटनेबाबत तीव्र शंका येणे आणि अनिश्चितता वाटणे
• त्यांच्या दृष्टिने त्यांची प्रत्येक गोष्ट व्यवस्थित किंवा समतोल असणे आवश्यक असते
• एखाद्या घटनेमुळे किंवा गोष्टीमुळे स्वतःचे नियंत्रण गमावले जातेय किंवा स्वतःला आणि इतरांना हानी पोचतेय अशी त्यांची दृढ कल्पना असते.
• मनात न ठरवता आक्रमक किंवा लैंगिक विचार येत राहतात

ओसीडी ही शांत आणि आनंदी जीवनावर आक्रमण करणारी आणि व्यत्यय आणणारी व्याधी असते. त्यामुळे नेहमीची आणि दैनंदिन कामे करणे कठीण जाते. ओसीडीमुळे बायपोलर डिसऑर्डर, नैराश्य आणि चिंता अशांसारखे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.

५. वर्तनविषयक व्यसने

व्यसनाधीनता केवळ पदार्थांच्या सेवनापुरती मर्यादित नसते. व्यसनामध्ये मेंदूत आनंदी भावना निर्माण होतात आणि ते वर्तन व्यक्ती पुनःपुन्हा करत राहते.
• सतत जुगार खेळणे- प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन
• सतत लैंगिक कृत्ये करत राहणे
• इंटरनेटमध्ये दीर्घकाळ रममाण होणे
• अनावश्यक असतानाही वस्तूंची खरेदी करत राहणे
• व्हिडिओ गेम्स खेळणे
• प्रमाणाबाहेर सतत खात राहणे
• एखादी गोष्ट धोकादायक आहे हे माहिती असूनही ती करत राहणे (रिस्की बिहेविअर)
यापैकी एक किंवा अधिक वर्तन व्यसनामुळे कौटुंबिक आणि कामाच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होत राहते, भावना व्यक्त करण्यासाठी अतिरेकी वर्तन घडत जाते, स्वतः समोर असलेले प्रश्न नाकारले किंवा लपवले जातात, व्यसन सोडण्याची मनोमन इच्छा असूनही ते चालूच ठेवले जाते, आर्थिक आणि नातेसंबंधांमध्ये समस्या निर्माण होतात, त्यातून त्या व्यक्तीचे एकूणच आरोग्य धोक्यात येऊ शकते.

उपचार- एखादी व्यक्ती कोणत्या वर्तन विकाराने ग्रस्त आहे, हे महत्त्वाचे नसते. आपल्या स्वतःमध्ये, कुटुंबीयांमध्ये किंवा नातेवाइकांमध्ये या आजारांची लक्षणे दिसत असतील तर त्वरित मनोविकारतज्ज्ञ डॉक्टरांना सल्ला घेणे महत्त्वाचे असते. त्या व्यक्तीची लक्षणे नियंत्रित करण्यात आणि त्यावर उपचार करण्यात हे तज्ज्ञ प्रशिक्षित असतात. या उपचारात -

• संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (सीबीटी)
• ट्रॉमा-फोकस्ड सीबीटी थेरपी
• ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन (टीएमएस)
• संभाषण थेरपी, ग्रुप थेरपी
• मानसोपचार आणि समुपदेशन
• औषधोपचार
एखाद्या क्लिष्ट प्रकरणामध्ये एकापेक्षा जास्त वर्तणूक विकार आढळतात, किंवा केवळ वर्तन थेरपीचा उपयोग कमी होत असल्याचे जाणवते, अशा वेळेस वर्तन उपचारांसोबत औषधे द्यावीच लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com