Bharat Bandh : शेतकरी, कामगारांची आज देशव्यापी संपाची हाक, काय सुरू, काय बंद ? घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा महत्त्वाची माहिती

Bharat Bandh 2026 : दहा केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी भारत बंदची घोषणा केली आहे. सुमारे ३ कोटींहून अधिक कामगार संपात सहभागी होण्याची शक्यता आहे.
Farmers and trade union members participate in Bharat Bandh protest rally demanding withdrawal of new labour laws in India.

Farmers and trade union members participate in Bharat Bandh protest rally demanding withdrawal of new labour laws in India.

Updated on

जर तुम्ही आज कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर आज तु्म्हाला भारत बंदचा फटका बसू शकतो. देशातील दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी संयुक्तपणे गुरुवारी भारत बंदची घोषणा केली आहे. वृत्तानुसार, ३ कोटींहून अधिक कामगार या निषेधात सामील होऊ शकतात, ज्याचा देशभरातील बँका, सरकारी कार्यालये, बाजारपेठा आणि वाहतूक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएस, सीआयटीयू, एआययूटीयूसी, टीयूसीसी, एसईडब्ल्यूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ आणि यूटीयूसी यासह १० केंद्रीय कामगार संघटनांच्या युतीने १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com