
भारतात दोन कोरोना लशींना मंजुरी मिळाली असून 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
हैदराबाद- भारतात दोन कोरोना लशींना मंजुरी मिळाली असून 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सर्व राज्यात लसीकरणासाठी तयारी केली जात आहे. मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड लशीची डिलिव्हरी देशातील विविध 13 ठिकाणी करण्यात आली होती. आता स्वदेशी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीची डिलिव्हरीही करण्यात आली आहे. आज सकाळी लशीची खेप हैदराबादमधून दिल्लीसह 11 शहरांमध्ये पाठवण्यात आली आहे.
बॅनर्जींच्या माता सीतेवरील वक्तव्याने संतांमध्ये आक्रोश; शीर कापणाऱ्याला 5...
न्यूज एजेंसी ANI नुसार, एका अधिकाऱ्याने सांगितलं की 6 वाजून 40 मिनिटांनी एअर इंडियाची फ्लाईट दिल्लीला पाठवण्यात आली. दिल्लीशिवाय कोवॅक्सिनशी खेप बंगळुरु, चेन्नई, पाटणा, जयपूर आणि लखनऊ येछथे पाठवण्यात आली आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एकूण 14 कन्सायंमेंट पाठवण्यात आले आहेत. सीरमने मंगळवारी कोविशिल्ड लस देशभरात पाठवली होती.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोवॅक्सिनचे 55 लाख आणि कोविशिल्डचे 1.1 कोटी डोस खरेदी करण्यात आले आहे. या दोन्ही लशींच्या आपत्कालीन वापराला DCGI ने मंजुरी दिली आहे. ICMR सोबत मिळून भारत बायोटेकने कोवॅक्सिन लशीची निर्मिती केली आहे. भारत बायोटेक पहिल्या 38.5 लाख डोससाठी 295 रुपये आकारात आहे. कंपनीने केंद्र सरकारला 16.5 लाख डोस मोफत देण्याचाही निर्णय घेतला आहे.
ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCBकडून समन्स
कोरोना प्रतिबंधक लस खरेदीची पहिली ऑर्डर "सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'कडे (एसआयआय) केंद्र सरकारने नोंदविली आहे. एक कोटी दहा लाख लसीच्या डोसचा हा खरेदी आदेश असून मंगळवारी सकाळपासून ही लस महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या राज्यांसाठी पुण्यातून रवाना करण्यात आली. या एका लसीच्या डोसची किंमत 200 रुपये निश्चित करण्यात आली आहे. पुणे एअरपोर्टवरुन आठ विमानांद्वारे कोरोना लस देशातील 13 ठिकाणी पाठवली गेली.
एअर इंडिया, स्पाईसजेट, इंडीगो या एअरलाईन्सच्या माध्यमातून पुण्यातून 56.5 लाख लसीचे खुराक दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहटी, शिलाँग, अहमदाबाद, हैद्राबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटना, बेंगलुरु, लखनऊ आणि चंदिगढ येथे रवाना झाले होते.