भारत बायोटेकच्या लशीमुळे स्वयंसेवकाचा मृत्यू? कंपनीने दिलं स्पष्टीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 10 January 2021

भारत बायोटेक लशीच्या ट्रायलदरम्यान (Bharat Biotech Vaccine Trial) भोपाळमधील एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला होता

नवी दिल्ली- भारत बायोटेक लशीच्या ट्रायलदरम्यान (Bharat Biotech Vaccine Trial) भोपाळमधील एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला होता. यावर भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे. स्वयंसेवकाला लस ट्रायलसंबंधी सर्व नियम आणि अटींची माहिती देण्यात आली होती. तसेच लस दिल्यानंतर 7 दिवसांसाठी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते, पण त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची लक्षणं दिसून आली नव्हती, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. भारत बायोटेक तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेत आहेत. 

कोठेंचा "राष्ट्रवादी'त प्रवेश, पण सदस्यत्व नाहीच ! ताकदवान कोठे...

भारत बायोटेकच्या म्हणण्यानुसार, कंपनीने सर्व मानकांचे पालन केले आहे. डोस दिल्यानंतर 7 दिवसांच्या देखरेखीमध्ये ते पूर्णपणे स्वस्थ आढळून आले होते. कोणतीही प्रतिकूल घटना पाहायला मिळाली नाही किंवा रिपोर्ट करण्यात आली नाही. भोपाळमधील गांधी मेडिकल कॉलेजकडून मिळालेल्या पोस्टमार्टम रिपोर्टच्या हवाल्याने भोपाल पोलिसांनी मृत्यूचं कारण कार्डियॉरेस्पिरेट्री फेलियर सांगितलं, जे विषामुळे होऊ शकते. पोलिस प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.

डोस घेतल्यानंतर 9 दिवसांनी स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. सुरुवातीच्या समीक्षेवरुन दिसतंय की मृत्यूचा आणि लशीचा काही संबंध नाही. तसेच कंपनीने सांगितले की, स्वयंसेवकाला लस देण्यात आली आहे की प्लेसिबो हे निश्चित सांगता येत नाही. कारण, स्टडीमघून याचा खूलासा झालेला नाही. 

दरम्यान, मध्य प्रदेशात कोव्हॅक्सिन लशीच्या वैद्यकीय चाचणीत सहभागी झालेल्या दीपक मारावी या स्वयंसेवकाला लस टोचल्याच्या 9 दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. मारावी यांना 12 डिसेंबर रोजी लस देण्यात आली होती. त्यांचा मृत्यू 21 डिसेंबरला झाला. 

मारावी यांनी स्वतःहून लस टोचून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार सर्व नियमानुसार त्यांना चाचणीत सहभागी होण्यास परवानगी दिल्याचा दावा डॉक्टर कपूर यांनी केला. मात्र त्यांना इंजेक्शनमधून लस दिली की सलाइनद्वारे याची खात्रीशीर माहिती नसल्याचे सांगून लसीकरणानंतर त्यांना ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेवले व त्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात आले, असा दावा डॉक्टरांनी केला. 

Special Report | मास्कमुळे कोरोना विषाणूचा वेग मंदावतो आयआयटीच्या संशोधकांचा...

लस दिल्यावर खालावली प्रकृती

मारावी हे आदिवासी समाजातील होते. ते मजुरी करीत असत. लसीकरणानंतर घरी आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही दिवसांनंतर खांदे दुखत असल्याची तक्रार त्यांनी १७ डिसेंबरला केली होती. चार दिवसांनंतर प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली. लशीच्या चाचणीत सहभागी होण्यासाठी मारावी यांची परवानगी घेतली नव्हती आणि सहभागाबद्दल कोणताही पुरावा त्यांना दिला नाही, असा आरोप भोपाळमधील सामाजिक कार्यकर्ते रचना धिंग्रा यांनी केला. रुग्णालयाने हा आरोप फेटाळला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Biotech Vaccine Trial one volunteer died compony explanation