

Bhilai Steel Scrap Theft
esakal
भिलाई (छत्तीसगड) : भिलाई पोलाद कारखान्यातून सुमारे २५० टन लोखंडी भंगार चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चोरीचे भंगार खरेदी करून त्याची विल्हेवाट लावल्याच्या आरोपावरून रायपूर पॉवर अँड स्टील लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनोद कुमार गर्ग आणि संचालक संदीप कुमार सिंह यांना अटक करण्यात आली.