esakal | 'गांधीगिरी' संदर्भात अमेरिकेच्या संसदेत मोठा निर्णय!
sakal

बोलून बातमी शोधा

Mahatma-Gandhi

भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये सांस्कृतिक आणि वैचारिक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

'गांधीगिरी' संदर्भात अमेरिकेच्या संसदेत मोठा निर्णय!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत एक विशेष विधेयक मांडण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरी हक्क नेते खासदार जॉन लुईस यांनी हे विधेयक मांडले. तसेच पुढील पाच वर्षांसाठी 15 कोटी अमेरिकन डॉलर एवढ्या निधीची मागणी त्यांनी विधेयकात केली आहे. 

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधत ही घोषणा करण्यात आली. यासाठी जाहीर करण्यात आलेले 'हाऊस बिल' (एचआर 5517) हे जगातील सर्वांत मोठ्या दोन मोठ्या लोकशाही देशांमधील मैत्री संबंधांना दर्शवत आहे. तसेच या विधेयकामध्ये 'गांधी-किंग विकास फाउंडेशन'ची स्थापना करण्याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे.

- शेतकऱ्यांनो सावधान, सरकारने दिलेले पैसे घेतले जाताहेत परत!

'युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट' (यूएसएआयडी) या भारतीय कायद्यांतर्गत या फाउंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी 'यूएसएआयडी'ला पुढील पाच वर्षांसाठी दर वर्षी तीन कोटी रुपये इतके अनुदान दिले जावे, अशी मागणीही या विधेयकात करण्यात आली आहे. नवभारत टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

- वैयक्तिक सूडभावनेतून मृत्युदंडाची शिक्षा - परवेझ मुर्शरफ

या विधेयकात असे म्हटले आहे की, हे फाउंडेशन अमेरिका आणि भारत सरकार संयुक्तरित्या परिषद स्थापन करेल. आणि ही परिषद आरोग्य, प्रदूषण आणि हवामान बदल, शिक्षण, महिला सशक्तीकरण या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थांना अनुदान देण्याची व्यवस्था करेल. या विधेयकाला भारतीय वंशाच्या अमेरिकी खासदार डॉ. एमी बेरा, रो खन्ना आणि प्रमिला जयपाल यांच्यासह ब्रेंडा लॉरेन्स, ब्रांड शेरमैन आणि जेम्स मैकगवर्न यांनी पाठबळ दर्शविला आहे.

- 'आपले पंतप्रधान हे मुके आणि बहिरे'; अनुराग कश्यपची मोदींवर टीका!

अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे. याबाबत बोलताना श्रृंगला म्हणाले, ''भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये सांस्कृतिक आणि वैचारिक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.''