Bhopal : तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बस चालकाच्या घरावर बुलडोझर

आरोपी विवाहित असून त्याला दोन मुली आहेत.
Bhopal Bus Driver House Demolished Metropolitan Municipality
Bhopal Bus Driver House Demolished Metropolitan Municipalityesakal
Summary

आरोपी विवाहित असून त्याला दोन मुली आहेत.

भोपाळ : भोपाळमधील (Bhopal) रातीबाद पोलीस स्टेशन हद्दीत (Ratibad Police Station) असलेल्या एका नामांकित खासगी शाळेतील (Private School) नर्सरीच्या विद्यार्थिनीसोबत स्कूल बसमध्ये (School Bus) बलात्कार झाल्यानं खळबळ उडाली होती. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर चालक आणि महिला मदतनीस दोघांनाही अटक करण्यात आली.

रातीबाद पोलीस ठाण्यात आरोपी चालक आणि एका महिलेविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर बसचालकाच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलाय. महसूल विभाग, पोलीस आणि महानगर पालिकेनं संयुक्तरित्या ही कारवाई केलीय.

Bhopal Bus Driver House Demolished Metropolitan Municipality
मी मोदींच्या धोरणांवर टीका करतो, राहुल गांधींप्रमाणं कोणाला शिव्या देत नाही : गुलाम नबी आझाद

मंगळवारी हे प्रकरण उघडकीला आलं होतं. या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी शाळेत तक्रार केली होती. मात्र, शाळेनं स्थापन केलेल्या अंतर्गत चौकशी समितीनं या चालकाला क्लीन चिट दिली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून या बस चालकाला आणि एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली.

Bhopal Bus Driver House Demolished Metropolitan Municipality
Accident : जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी

आरोपी विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. त्यानं तीन महिन्यांपूर्वीच शाळेत काम सुरू केलं होतं. पीडितेनं एका ग्रुप फोटोवरून आरोपीची ओळख पटवली. आरोपी चालक हा शाहपुरा परिसरातील वसंत कुंज कॉलनीजवळील टाकीसमोर बागेच्या जमिनीवर बांधलेल्या घरात राहतो. हे घर अवैध असल्याचं महानगर पालिकेचं म्हणणं आहे. जिल्हा प्रशासनातर्फे ही कारवाई करण्यात आलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com