esakal | साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रकृती बिघडली; उपचारांसाठी विमानानं मुंबईला हलवलं
sakal

बोलून बातमी शोधा

sadhvi pradnya singh

साध्वी प्रज्ञासिंह यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.

साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रकृती बिघडली; उपचारांसाठी विमानानं मुंबईला हलवलं

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने विमानाने मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
  

भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना शनिवारी दुपारी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना तातडीने विशेष विमानानं मुंबईला हलवण्यात आलं. गेल्याच महिन्यांत त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सातत्याने बैठका सुरु होत्या. शनिवारी देखील त्यांची जिल्हा पंचायत कार्यालयात दिशा समितीची बैठक होती. या बैठकीला त्या हजेरी लावणार होत्या मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्रकृती बिघडली. 

इम्रान खान यांनी राखली सत्ता; जिंकला विश्वासदर्शक ठराव!

दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांना दिल्लीतील एम्समध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील त्यांना श्वास घेण्यास त्रास, उच्च रक्तदाब आदी त्रास असल्याचे सांगण्यात आलं होतं. यामुळे त्यांची करोनाची चाचणी देखील करण्यात आली होती ही चाचणी निगेटिव्ह आली होती. गेल्याच वर्षी जूनमध्ये देखील प्रज्ञासिंह यांची एका कार्यक्रमादरम्यान अचानक प्रकृती बिघडली होती. कार्यक्रमादरम्यान अचानक त्या बेशुद्ध होऊन खाली पडल्या होत्या. 

वॉशिंग्टन : धोक्याची घंटा ! जगातील दोन देशांमध्येच आहेत 30 टक्के नवीन रुग्ण

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आरोप असून त्यांच्यावर मोक्कांतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली होती, कालांतराने एनआयएकडून तो  हटवण्यात आला त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. दरम्यान, त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्विकारत २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली आणि त्या निवडणूनही आल्या. या निवडणुकीत त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्वीजय सिंह यांचा पराभव केला. दरम्यान, मधल्या काळात प्रज्ञासिंह यांनी महात्मा गांधीचा मारेकरी गोडसेच्या समर्थनार्थ वादग्रस्त विधान केलं होतं, त्यावेळी त्या चर्चेत आल्या होत्या. याविधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना समज दिली होती.

भारत India

loading image