Wrestlers Protest: दिल्ली पोलिसांची पक्षपाती वृत्ती, कुस्तीपटूंवरील कारवाईवर महिला आयोग संतप्त!

Wrestlers Protest
Wrestlers Protest

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा रविवारी संपूर्ण देशाने पाहिला. दुसरीकडे, दिल्लीतही अशी घटना घडली, ज्यावर संपूर्ण देशातून खंत व्यक्त होत आहे. देशाला पदक जिंकून देणाऱ्या कुस्तीपटूंचे रस्त्यावरील फोटो पाहून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी महिला कुस्तीपटूंना पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली. दरम्यान  दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहून WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करण्याची तसेत कुस्तीपटूंची सुटका आणि त्यांना ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्वाती मालीवाल म्हणाल्या, "दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली आणि त्यांना आज जबरदस्तीने ताब्यात घेतले. हे पाहून दिल्ली महिला आयोगाला खूप दुःख झाले आहे. एका महिन्यापूर्वी, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असताना खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर, त्यांच्याविरूद्ध या प्रकरणात दोन एफआयआर नोंदवण्यात आले. त्यांच्यावर आधीच 40 चालू गुन्हेगारी खटले चालू आहेत.

Wrestlers Protest
New Parliament Building : 'भारताच्या कन्या वेदनेत, कसं म्हणायचं लोकशाहीची जननी?'

एका अल्पवयीन मुलीने खासदारावर लैंगिक छळाचा आरोप करूनही दिल्ली पोलिसांना आजपर्यंत त्यांना अटक केली नाही.  अटक करण्यात अपयश आले आहे. यामुळे महिला कुस्तीपटूंना गेल्या महिनाभरापासून जंतरमंतरवर आंदोलन करण्यास भाग पाडले आहे. दिल्लीत, दररोज सुमारे 6 लैंगिक अत्याचाराची प्रकरणे नोंदवली जातात आणि प्रत्येक प्रकरणात दिल्ली पोलिस आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करतात. मग आजपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अटक का झाली नाही? हा घोर अन्याय नाही तर काय आहे? आरोपी खासदाराची बाजू घेत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या या उघड पक्षपाती वृत्तीने न्यायाची थट्टा केली आहे, असे मातीवाल म्हणाल्या.

आज महिला कुस्तीपटूंना त्यांच्या कुटुंबियांसह दिल्ली पोलिसांनी मारहाण केली आणि जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि तेथून नेले. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या महिला चॅम्पियन्सना दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने रस्त्यावर ओढले आहे ते अत्यंत अशोभनीय असल्याचे महिला आयोगाने म्हटले आहे.

या महिला कुस्तीपटू , साक्षी मलिक, विनेश फोगट आणि संगिता फोगट या सर्व देशाच्या चॅम्पियन आहेत. राष्ट्रकुल खेळ आणि ऑलिम्पिकसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर त्यांनी देशाचे नाव कमावले आहे. त्यामुळे ब्रिजभूषुण सिंह यांना तातडीने अटक करण्यात यावी. तसेच महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांची दिल्ली पोलिसांनी तात्काळ सुटका करावी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी दिल्ली महिला आयोगाने केली आहे. 

Wrestlers Protest
Rahul Gandhi: "अहंकारी राजा चिरडतोय जनतेचा आवाज" ; कुस्तीपटूंवरील कारवाईवरून राहुल गांधी आक्रमक!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com