अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली कॉलर ट्यून होणार बंद; कोण घेणार त्यांची जागा?

टीम ई-सकाळ
Thursday, 14 January 2021

'दो गज दूरी, मास्क है जरुरी' अशा आशयाची बच्चन यांच्या आवाजतली कॉलर ट्यून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : जगभरात दहशत माजवणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत सर्वच माध्यमांद्वारे जनजागृती केली जात होती. यात मोबाईलवर ऐकू येणाऱ्या कॉलर ट्यूनचाही समावेश होता. बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजामधील कॉलर ट्यून गेल्या काही महिन्यांपासून आपण सर्वजण ऐकत होतो, मात्र ती कॉलर ट्यून आता बंद होणार आहे. 

COVID-19 Vaccination Drive: PM मोदी करणार शुभारंभ; जाणून घ्या वेळ आणि बरंच काही!​

'दो गज दूरी, मास्क है जरुरी' अशा आशयाची बच्चन यांच्या आवाजतली कॉलर ट्यून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवार (ता.१५) पासून मोबाइलची डिफॉल्ट कॉलर ट्यून बदलणार आहे. कोरोनापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी शासन हरप्रकारे प्रयत्न करत होते. त्याचाच एक भाग म्हणून मोबाईलवर कोरोना जनजागृतीबाबत कॉलर ट्यून बनवण्यात आली होती. ती बंद करण्याच्या निर्णय घेतला असून त्याची जागा आता नवीन कॉलर ट्यून घेणार आहे. 

कोरोना लसीशी माहिती देणारी ही नवी कॉलर ट्यून हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असणार आहे. जसलीन भल्ला यांच्या आवाजातील नवी कॉलर ट्यून आता यापुढे ऐकू येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे. 

यंदाचा प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; ५५ वर्षानंतर घडतोय नवा इतिहास!​

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बिग बी यांच्या आवाजातील कॉलर ट्यून काढण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत अमिताभ बच्चन यांच्याऐवजी खऱ्या कोरोना वॉरियरचा आवाज असणे आवश्यक आहे, असे म्हटले होते. त्यामुळे बिग बी यांच्या आवाजातील कॉलर ट्यून काढावी, असे याचिकेत नमूद केले होते. विशेष म्हणजे, कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय शोसाठी यापुढे शूटिंग करणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. विश्रांती गरजेची असल्याने रिटायर्ड होण्याचा मानसही त्यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. 

'तारीख पे तारीख मिलती रही है, लेकिन इन्साफ नही मिला, माय लॉर्ड'

कोण आहेत जसलीन भल्ला?
जसलीन भल्ला या व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहेत. अनेक वर्षांपासून त्या अनेक जाहिरातींसाठी व्हॉईस ओव्हर देत आहेत. दिल्ली मेट्रो, स्पाइस जेट आणि इंडिगो विमानात ऐकू येणारा आवाज जसलीन यांचा आहे.    

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big B Amitabh Bachchan Covid Caller Tune Out