Narendra Modi Varanasi: वाराणसीतून प्रियांका गांधी लढल्या असत्या तर मोदी 3 लाख मतांनी हारले असते; राहुल गांधींचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी रायबरेलीच्या जनतेला संबोधित केलं.
Priyanka Gandhi_Narendra Modi
Priyanka Gandhi_Narendra Modi

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी रायबरेली लोकसभा मतदारसंघात एका जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी मोठा दावा करत म्हटलं की, जर माझी बहिण प्रियांका गांधी यांनी युपीच्या वाराणसीच्या जागेवरुन निवडणूक लढवली असती तर प्रधानमंत्री मोदी जिंकू शकले नसते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत द्वेष, हिंसा आणि अहंकाराविरोधात लोकांनी मतदान केलं यासाठी त्यांनी धन्यवाद मानले. (Big claim of Rahul Gandhi about Narendra Modi says if Priyanka Gandhi fought from Varanasi Modi would have lost by 3 lakh votes)

Priyanka Gandhi_Narendra Modi
Hunter Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या मुलाला होणार 25 वर्षांचा तुरुंगवास? बेकायदा बंदूकप्रकरणात ठरला दोषी

राहुल गांधी काय म्हणाले?

रायबरेलीतील आभार सभेत राहुल गांधी म्हणाले, या निवडणुकीत भारतानं हा संदेश दिला आहे की, आम्हाला नरेंद्र मोदींचं व्हिजन नको आहे. आम्हाला द्वेष नकोय, आम्हाला हिंसा नकोय आम्हाला प्रेमाचं दुकानं हवं आहे. आम्हाला देशासाठी नवं व्हिजन हवं आहे. जर देशाला नवं व्हिजन द्यायचं असेल तर ते उत्तर प्रदेशातूनच द्यावं लागेल. उत्तर प्रदेशनं हा संदेश दिला आहे की, आम्हाला राज्यात आणि देशात इंडिया आघाडी, समाजवादी पार्टी अन् काँग्रेस आवडते आहे.

Priyanka Gandhi_Narendra Modi
Modi Ka Pariwar: प्रचार संपला! आता 'मोदी का परिवार' हटवा; प्रधानमंत्र्यांचं फॉलोवर्सना आवाहन

तर मोदी दोन-तीन लाख मतांनी हारले असते

राहुल गांधींनी यावेळी अयोध्येतील जागेच्या भाजपच्या पराभवावर भाष्य करताना म्हटलं की, अयोध्येच्या जनतेनं देखील उत्तर दिलं आहे. केवळ अयोध्येतच नव्हे वाराणसीत देखील प्रधानमंत्री जीव वाचवून निघाले आहेत. मी माझ्या बहिणीला सांगत होतो की, जर तीनं वाराणसीतून निवडणूक लढवली असती तर प्रधानमंत्री दोन-तीन लाख मतांनी हारले असते. मी हे अहंकारानं बोलत नाही कारण जनतेनं त्यांचं राजकारण नाकारलं आहे.

Priyanka Gandhi_Narendra Modi
DA Hike Bank Employees: बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 16 टक्के वाढीची घोषणा

सर्वांचे मानले धन्यवाद

राहुल गांधी पुढे म्हणाले, सुरुवात तुमच्या हृदयातून झाली म्हणूनच आता बदल दिसून आला आहे. मनापासून मी तुमचे धन्यवाद मानले. येणाऱ्या काळात देशासमोरचे जे खरे मुद्दे आहेत. ज्यामध्ये बेरोजगारी, महागाई, शेतकरी आणि कष्टकरी यांचे मुद्दे उपस्थित केले जातील. तसेच गरीबांची मदत करण्याचं राजकारण असायला हवं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com