हायकोर्टाचा मोठा निर्णय, कोणासोबतही राहू शकतात सज्ञान मुलगा-मुलगी

allahabad high court main.jpg
allahabad high court main.jpg
Updated on

अलाहाबाद- सज्ञान मुलगा किंवा मुलगी आपल्या मर्जीने कोणाबरोबरही राहू शकतात असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. सज्ञान मुला-मुलींच्या जीवनात हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. त्याचबरोबर संविधान प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आवडीचा धर्म स्वीकारण्याचा अधिकार देतो. परंतु, केवळ लग्नासाठी धर्मांतर केले जात असेल तर ते चुकीचे आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, विशेष विवाह अधिनियमा अंतर्गत धर्म न बदलता दोन भिन्न धर्मातील व्यक्ती विवाह करुन आपले वैवाहिक जीवन व्यतीत करु शकतात. हा कायदा सर्व धर्मीयांसाठी लागू आहे. तरीही लोक लग्नासाठी धर्मांतर करत आहेत, हे योग्य नाही, अशी खंतही न्यायालयाने व्यक्त केली.

न्यायालयाने वेगळ्या धर्मातील युवक आणि युवतींना आपल्या मर्जीने कोठेही आणि कोणाबरोबरही राहण्यासाठी स्वातंत्र्य दिले आहे. हा आदेश न्यायमूर्ती जे जे मुनीर यांच्या एकल खंडपीठाने दिला. 

याप्रकरणी, मनिषा नावाच्या मुलीने घरातून पळून जाऊन अझहरशी (दोन्ही नावे काल्पनिक) लग्न केले. कुटुंबीयांना हे समजल्यानंतर त्यांनी तिला पकडून एका घरात नजरकैदेत ठेवले. त्याप्रकरणी एक याचिका दाखल करण्यात आली होती. 

न्यायालयाने 18 वर्षीय मुलीला हजर करण्याचे निर्देश दिले होते. त्या मुलीने आपल्या पतीबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुलीच्या जबाबाच्या आधारे तिला आपल्या मर्जीने राहण्यास न्यायालयाने परवानगी दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com