राज्यसभा निवडणुकीचा थरार : भाजपला घाबरुन काँग्रेसनं आपले आमदार दुसरीकडं पळवले

Rajasthan Rajya Sabha Election
Rajasthan Rajya Sabha Electionesakal
Summary

उद्योगपती सुभाष चंद्रा यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अचानक प्रवेश झाल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडालीय.

जयपूर : राजस्थानात राज्यसभा निवडणुकीचे (Rajasthan Rajya Sabha Election) उमेदवारी अर्ज पूर्ण झाल्यानंतर विजयाची रणनीती आखली जात आहे. त्यासाठी काँग्रेसनं आमदारांसाठी (Congress MLA) तगडा बंदोबस्त केलाय. आमदारांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसनं उदयपूरच्या (Udaipur) त्याच हॉटेलमध्ये हलवण्यास सुरुवात केलीय, ज्या हॉटेलमध्ये यापूर्वी चिंतन शिबिराचं आयोजन केलं होतं. पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की, निवडणुकीत भाजप घोडेबाजार करू शकतं, त्यामुळं पक्षाच्या आमदारांची एकजूट केली जात आहे. राज्यसभेची निवडणूक 10 जून रोजी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या सर्व आमदारांना हायकमांडनं (Congress High Command) उदयपूरला जाण्यास सांगितलंय. काही बुधवारीच उदयपूरला पोहोचले आहेत. काही आज निघण्याची शक्यता आहे. तर, उर्वरित उद्या पोहोचतील. काँग्रेसचे आमदार, अपक्ष आणि आम्हाला पाठिंबा देणाऱ्या इतर पक्षांच्या नेत्यांनाही उदयपूरला घेऊन जाणार असल्याची माहिती एका काँग्रेस नेत्यानं दिलीय.

राज्यसभेच्या उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी उद्योगपती सुभाष चंद्रा (Subhash Chandra) यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अचानक प्रवेश झाल्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडालीय. भाजप आणि आरएलपीनं चंद्रा यांना आधीच पाठिंबा दिलाय. त्यामुळं काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

काँग्रेसनं 'या' दिग्गजांना उतरवलं निवडणूक रिंगणात

विशेष म्हणजे, काँग्रेसनं राजस्थानमधून मुकुल वासनिक (Mukul Wasnik), रणदीप सिंग सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना वरच्या सभागृहाच्या चार जागांसाठी उमेदवारी दिलीय. त्याचवेळी भाजपनं माजी राज्यमंत्री घनश्याम तिवारी यांना उमेदवारी दिलीय. तर, उद्योगपती सुभाष चंद्रा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केलीय. चंद्रा सध्या हरियाणातून वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 1 ऑगस्ट रोजी संपत आहे.

Rajasthan Rajya Sabha Election
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहेत : शिवराज सिंह चौहान

काय आहे राजकीय समीकरण?

राज्य विधानसभेत 108 आमदारांसह सत्ताधारी काँग्रेस चारपैकी दोन जागा जिंकण्याची शक्यता आहे. त्याचवेळी एका जागेवरून भाजप जिंकण्याची दाट शक्यता आहे. कारण, सुभाष चंद्रा यांनीही या चार जागांपैकी एका जागेवर दावा सादर केलाय, त्यामुळं काँग्रेसची एका जागा कमी होण्याची शक्यता आहे. याआधी काँग्रेस 41+41+41 च्या फॉर्म्युल्यानं विजय मिळवत होती. मात्र, आता तिसर्‍या जागेसाठी काँग्रेसकडं केवळ 26 मतं दिसत आहेत. म्हणजेच, तिसरी जागा जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या 41 पेक्षा 15 मतं कमी आहेत. 71 आमदार असलेल्या भाजपला एक जागा मिळाल्यानंतर 30 मतं पडतील. त्यामुळं राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठीची शर्यत अंतिम रेषा गाठण्यासाठी भाजप-काँग्रेस या दोन्ही पक्षांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे.

Rajasthan Rajya Sabha Election
माजी पंतप्रधानांनी राज्यसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधींकडं मागितला पाठिंबा
Rajasthan Rajya Sabha Election
भाजप प्रवेश करण्यापूर्वी हार्दिकचं नवं ट्विट; म्हणाला, मी मोदींचा..

विशेष म्हणजे, विधानसभेत 13 अपक्ष उमेदवार आहेत. इतर पक्षांमध्ये विधानसभेच्या दोन जागांसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय), राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (आरएलपी) तीन, ट्रायबल पार्टी ऑफ इंडिया दोन, तर राष्ट्रीय लोकदलाकडं एक जागा आहे. त्यामुळं या पक्षातील नेत्यांचा कौल कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com