पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार? माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

येत्या 17 ऑक्टोबरला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारी समितीनं घेतला आहे.
Congress President Election Prithviraj Chavan
Congress President Election Prithviraj Chavanesakal
Summary

येत्या 17 ऑक्टोबरला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारी समितीनं घेतला आहे.

Congress President Election : लोकसभेच्या सलग 2 निवडणुकांत झालेले पराभव, विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकाल, त्यानंतर विविध मार्गांनी काँग्रेसची सरकारं सत्तेतून जाणं, नेत्यांपाठीमागचा चौकशीचा ससेमिरा त्यात आता गुजरात, हिमाचल आणि हरियाणा राज्याच्या आणि २०२४ ची लोकसभेची तोंडावर येऊन ठेपलेली निवडणूक अशा सगळ्या परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक (Congress President Election) होत आहे.

Congress President Election Prithviraj Chavan
Manipur : बिहारपाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपला मोठा धक्का; आमदार काढून घेणार पाठिंबा

येत्या 17 ऑक्टोबरला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारी समितीनं घेतला आहे. अध्यक्षपदासाठी गांधी परिवारातलं कुणीही नको, अशी अनेकांची धारणा आहे. राहुल गांधींनीही (Rahul Gandhi) त्यासंबंधीची तयारी दाखवलीय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

Congress President Election Prithviraj Chavan
Som Prakash : 'कॉंग्रेस संपण्याच्या मार्गावर, प्रादेशिक पक्षही जास्त काळ टिकतील असं वाटत नाही'

याच दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतंच काँग्रेसला रामराम ठोकलेल्या गुलाम नबी आझाद यांची भेट घेतल्यानं पृथ्वीराज बाबाही अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का? अशी चर्चा रंगलीय. मात्र, त्यांनी स्वतःच याबाबत खुलासा करत आपली भूमिका स्पष्ट केलीय.

Congress President Election Prithviraj Chavan
Taj Mahal : ताजमहाल की तेजो महालय? नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आग्रा महापालिकेत चर्चा

पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही. मी उमेदवार असणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच जर फॉर्म भरला तर सर्वांना ते कळेलच ना असंही त्यांनी म्हंटलय. पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच गुलाम नबी आझाद यांची दिल्लीत भेट घेतली होती. मात्र, ही शिष्टाचाराची भेट होती, त्यात दुसरं काहीही नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, येत्या 22 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे. त्यानंतर 24 ते 30 सप्टेंबरदरम्यान अर्ज दाखल करता येणार आहे. 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com