esakal | तमिळनाडूतील अभिनेता विजयला उच्च न्यायालयाचा मोठा झटका
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay

तमिळनाडूतील अभिनेता विजयला उच्च न्यायालयाचा मोठा झटका

sakal_logo
By
वॉल्टर स्कॉट : सकाळ न्यूज नेटवर्क

चेन्नई - तमिळनाडूतील (Tamilnadu) सर्वाधिक महाग अभिनेता विजय (Vijay) याला मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) मोठा झटका देत एक लाख रुपये दंड (Fine) भरण्याचा आदेश मंगळवारी (ता. १३) दिला. (Biggest blow to Tamil Nadu actor Vijay by High Court)

इंग्लंडमधून आयात केलेल्या रोल्स रॉईस या आलिशान मोटारीवरील कराविरोधात विजयने उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळलीच शिवाय एक लाख रुपयांच्या दंड ठोठावत ही रक्कम तमिळनाडूच्या मुख्यमंत्री कोरोना सहाय्य निधीत दोन आठवड्यात जमा करण्याचा आदेशही दिला आहे. विजयने सहा कोटी रुपये किंमत असलेल्या या मोटारीवर २० टक्के प्रवेश करातून सूट मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती.

हेही वाचा: भारताचं फायटर विमान 'तेजस'ला अमेरिकन इंजिनचं बळ

मद्रास उच्च न्यायालयाने विजयची याचिका काल फेटाळली. कर न भरल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड भरण्याचे निर्देशही दिले. विजय याची याचिका फेटाळताना न्यायाधीश एस.एम. सुब्रह्मण्यम म्हणाले की, प्रतिष्ठीत अभिनेत्याने कर भरणा त्वरित आणि वेळेवर करणे अपेक्षित आहे.

loading image