esakal | बिहार निवडणूक : BJP-LJP मध्ये जागावाटपाचा तिढा; चिराग पासवान यांचे नड्डांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

BJP & LJP

बिहार निवडणूकीत लोजपाला भाजपाच्या जागांमधून काही जागा देण्यात येणार आहेत. भाजपने दिलेल्या प्रस्तावार लोजपा एकदोन दिवसातच निर्णय घेईल अशी आशा आहे.

बिहार निवडणूक : BJP-LJP मध्ये जागावाटपाचा तिढा; चिराग पासवान यांचे नड्डांना पत्र

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणूकांचे बिगूल वाजले आहे. निवडणूकांच्या तारखा आयोगाकडून जाहीर झाल्या असून कोरोना प्रादूर्भावाच्या काळात होणारी ही देशातील पहिलीच निवडणूक आहे. असं असलं तरी निवडणूकीतला जोर हा नेहमीसारखाच आहे.

मात्र, बिहारच्या निवडणूकीत अजूनही एनडीए आघाडीच्या जागावाटपांची स्थिती संदिग्ध आहे. बिहारमधील लोक जनशक्ती  पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यादरम्यान जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी पत्र लिहल्यानंतर ही बातचित झाली. मिळालेल्या माहितीनुसार, चिराग पासवान यांच्या नेतृत्वातील लोजपाला 42 जागांची अपेक्षा आहे. किंवा मग, 32 जागा, दोन विधानपरिषदेतील जागा आणि उत्तर प्रदेशातून एक राज्यसभा सीट अशी मागणी आहे. 

हेही वाचा - केंद्र सरकारने ऑफसेट पॉलिसी रद्द; कॅगच्या अहवालानंतर संरक्षण मंत्रालयाचा निर्णय
मात्र, भाजपाकडून सध्यातरी 27 विधानसभेच्या जागा आणि दोन विधानपरिषदेच्या जागा असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. लोजपाला भाजपाच्या वाट्याच्याच जागांमधून जागा देण्यात येणार आहेत. भाजपने दिलेल्या प्रस्तावार लोजपा एकदोन दिवसातच निर्णय घेईल अशी आशा आहे. 

143 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी
चिराग  पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी विधानसभेच्या 143 जागांवर निवडणूका लढवण्याची तयारी आहे. जर जागावाटपात अपेक्षित जागा नाही मिळाल्या तर पार्टी एनडीएमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे लढू शकते. चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा या सर्वांना वेगवेगळी पत्रे लिहलेली आहेत. पासवान यांनी जागावटप न झाल्याचा मुद्दा पत्रात मांडला आहे. 

हेही वाचा - भाजप युवा मोर्चाच्या नेत्याचं बेंगळुरूविषयी धक्कादायक वक्तव्य; सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
एनडीएत जागावाटपांबाबत संदिग्धता
आणखी दोन दिवसातच बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरणे सुरु होणार आहे. परंतु, अजूनही एनडीएमध्ये जागावाटपाचे चित्र स्पष्ट नाही आहे. बिहार निवडणूका या तीन टप्प्यात होणार आहेत. पहिला टप्पा हा 28 ऑक्टोबरला, दुसरा तीन नोव्हेंबरला तर तिसरा सात नोव्हेंबरला होणार आहे. निवडणूकांचा निकाल हा 10 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.