esakal | 'ते देशाचे PM आहेत, काहीही बोलू शकतात, जरा बेरोजगारी, भूकबळीवरही त्यांनी बोलावं'
sakal

बोलून बातमी शोधा

tejashwi yadav modi.jpg

पंतप्रधान मोदींनी तेजस्वी यादव यांना 'जंगलराजचे युवराज' असे म्हटले होते.

'ते देशाचे PM आहेत, काहीही बोलू शकतात, जरा बेरोजगारी, भूकबळीवरही त्यांनी बोलावं'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा Bihar Election 2020 - बिहारमध्ये महाआघाडीचे नेतृत्त्व करत असलेले आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी प्रचारसभेत मोदींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत, काहीही बोलू शकतात. पण त्यांनी गरिबी, भूकबळी, बेरोजगारी, स्थलांतर यासारख्या मुद्द्यांवर बोलले पाहिजे, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. 

तेजस्वी यादव प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान मोदींनी त्यांना 'जंगलराजचे युवराज' असे म्हटले होते. त्यावर तेजस्वी यादव यांना जेव्हा विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की, ते देशाचे पंतप्रधान आहेत. ते काहीही बोलू शकतात. मला त्यावर काही बोलायचं नाही. ते आलेच होते तर बिहारच्या विशेष पॅकेजबद्दल, बेरोजगारी, भूकबळीवर बोलायला हवे होते. लोकांना ते यावर बोलतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी यावर काहीच भाष्य केले नाही.  

हेही वाचा- पाकिस्तानवर विश्वास ठेवणाऱ्या काँग्रेसचे डोळे उघडतील; नड्डांनी शेअर केला VIDEO

आमच्या विरोधात तर पंतप्रधान, मुख्यमंत्री, भारत सरकार, बिहार सरकार, जगातील सर्वात मोठा पक्ष आणि 30-30 हेलिकॉप्टर लागले आहेत. तरीही पंतप्रधान अशा पद्धतीने बोलत असतील तर जनता सर्व ओळखते आणि त्यांना सर्व दिसत आहे. 

हेही वाचा- #Positive Story - 'बाबा का ढाबा'नंतर आणखी एक आजोबा सोशल मीडियावर हिट; औषधी वनस्पतींचा खप दुप्पट

पहिल्या टप्प्यात मतदारांनी बेरोजगारी, स्थलांतर, गरिबी, बंद कारखानेसारख्या मुद्द्यांवर मोठ्या चढाओढीने मतदान केले आहे. यासाठी मी सर्व जनतेला नमन करतो. सध्याच्या निवडणुकीत नितीशकुमार सरकारच्या भ्रष्टाचाराचाही एक मोठा मुद्दा आहे, असेही ते म्हणाले.