By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

Election Commission Announces By-elections Alongside Bihar Polls: जाणून घ्या, नेमकी कोणत्या राज्यात आणि कोणत्या मतदारसंघात होणार आहे पोटनिवडणूक?
Election Commission of India announces Bihar Assembly elections along with by-elections in seven states for eight assembly constituencies.

Election Commission of India announces Bihar Assembly elections along with by-elections in seven states for eight assembly constituencies.

Sakal

Updated on

Eight Assembly Seats Across Seven States to Go for By-polls : निवडणूक आयोगाने अखेर आज(सोमवार) बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यंदा बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान दोन टप्प्यात होणार आहे आणि  त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. तर बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांचा घोषणा करतानाच, निवडणूक आयोगाने अन्य सात राज्यांमधील आठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचीही घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणूक आणि इतर राज्यांमधील पोटनिवडणुकांबाबत सविस्तर माहिती दिली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत बिहार निवडणुकांची घोषणा केली. यासोबतच जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, झारखंड, मिझोराम, पंजाब, तेलंगणा आणि राजस्थानमधील अनेक जागांसाठी पोटनिवडणुकाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

 या सात राज्यांमधील आठ जागांसाठी पोटनिवडणुका ११ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. पोटनिवडणुकीनंतर, सर्व जागांसाठी मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी होईल. जम्मू आणि काश्मीरमधील दोन जागांसाठी पोटनिवडणुका होतील, तर इतर सहा राज्यांमध्ये प्रत्येकी एक जागेवर निवडणूक होणार आहे.

Election Commission of India announces Bihar Assembly elections along with by-elections in seven states for eight assembly constituencies.
Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

कुठे होणार पोटनिवडणूक? -

जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम आणि नागरोटा येथे मतदान होणार आहे. याशिवाय, राजस्थानमधील अंता, झारखंडमधील घाटशिला, तेलंगणातील जुबली हिल्स, पंजाबमधील तरनतारन, मिझोरममधील दंपा आणि ओडिशातील नुआपाडी येथे पोटनिवडणुका होणार आहेत.

Election Commission of India announces Bihar Assembly elections along with by-elections in seven states for eight assembly constituencies.
Bihar Assembly Election Update : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच घडणाऱ्या 'या' १० गोष्टी!

या पोटनिवडणुकांसाठी ११ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी मतदान होणार आहे. सर्व आठ जागांसाठीच्या पोटनिवडणुकांचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी बिहारच्या निवडणूक निकालांसह जाहीर केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com