उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना कोरोना; मंत्रिमंडळ बैठकीआधी खळबळ | Bihar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना कोरोना; मंत्रिमंडळ बैठकीआधी बिहारमध्ये खळबळ

मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी करण्यात आलेल्या चाचणीत ही बाब समोर आली.

उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना कोरोना; मंत्रिमंडळ बैठकीआधी बिहारमध्ये खळबळ

पाटना - बिहारमध्ये (Bihar) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर काही मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी करण्यात आलेल्या चाचणीत ही बाब समोर आली. उमुख्यमंत्री रेणु देवी (Renu Devi) आणि तारकिशोर प्रसाद (Tarkishor Prasad) यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्याशिवाय मंत्री सुनिल कुमार (Sunil Kumar) आणि अशोक चौधरी (Ashok Kumar) यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी ट्विटरवर म्हटलं की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी पटना इथं घरी क्वारंटाइन आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करावी आणि काळजी घ्या.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं मंत्रिमंडळाची बैठक ऑनलाइन घेण्यात येणार आहे. सहकारी मंत्र्यांमध्ये कोरोनाचे रिपोर्ट आल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतरच मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी मंत्रिमंडळाची बैठक ऑफलान न घेता व्हर्च्युअल घेण्याची घोषणा केली.

कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नेत्यांकडून मात्र खबरदारी घेतली जात नसल्याचं चित्र आहे. दोनच दिवसांपूर्वी सोमवारी उपमुख्यमंत्री रेणु देवी यांनी बेगुसराय जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक घेतली होती. यामध्ये भाजप आमदारांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी रेणु देवी यांच्यासह अनेकजण मास्क न घालताच दिसत होते.

हेही वाचा: देशात कोरोनाचा स्फोट; 24 तासात 58 हजार 97 नवे रुग्ण, 534 मृत्यू

बिहारमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे ८९३ नवे रुग्ण सापडले आहेत. फक्त पटनामध्येच यापैकी ५६५ जणांचा समावेश आहे. सध्या राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या २ हजारांपेक्षा जास्त आहे. सोमवारी बिहारमध्ये ३४४ नवे कोरोना रुग्ण सापडले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BiharCoronavirus
loading image
go to top