Nitish Kumar Threat: "भाजपपासून वेगळं व्हा अन्यथा बॉम्बनं उडवून देऊ"; CM नितीश कुमार यांना धमकी

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुन्हा एकदा विरोधकांची इंडिया आघाडी सोडून भाजपसोबत गेले आहेत.
Nitish Kumar
Nitish Kumar

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुन्हा एकदा विरोधकांची इंडिया आघाडी सोडून भाजपसोबत गेले आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांच्यानावे धमकीचा मेसेज आला आहे. यात भाजपपासून वेगळं व्हा अन्यथा तुम्हाला बॉम्बनं उडवून देऊ, असं म्हटलं आहे.

बिहारचे पोलीस महासंचालकांना हा मेसेज आला आहे. हा मेसेज करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. (bihar cm nitish kumar threat message separate from BJP or we will bomb it)

Nitish Kumar
Electoral Bond Scheme: इलेक्टोरल बॉण्ड असंवैधानिक, सुप्रीम कोर्टानं घातली बंदी; सरकारला झटका

नेमकं मेसेजमध्ये काय म्हटलंय?

30 जानेवारी रोजी बिहारचे पोलीस महासंचालक आरएस भट्टी यांच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज आणि ऑडिओ क्लीप आली होती. या मेसेजमध्ये म्हटलं की, "जर मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपपासून वेगळे झाले नाहीत तर इतर आमदारांसोबत त्यांना बॉम्बनं उडवून देऊ, जस उत्तर प्रदेशात झालं होतं" या धमकीची दखल राज्याच्या आर्थिक घोटाळा विभागानं घेतली आहे.

Nitish Kumar
Farmers Protest: "सरकारविरोधात असंतोषासाठी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात माओवादी सक्रीय"; IG संदीप पाटील यांची माहिती

या धमकीनंतर बिहारच्या आर्थिक घोटाळा विभागानं कर्नाटकात छापेमारी केली आणि धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडं चौकशी सुरु आहे. त्यानंतर आरोपील ताब्यात घेऊन पोलीस काल रात्री उशीरा पाटण्यात दाखल झाले. (Latest Marathi News)

पोलीस महासंचालकांना ज्या फोन क्रमांकावरुन मेसेज आला त्याची चौकशी केली असता त्याचं लोकेशन कर्नाटकातील देवनगिरी जिल्ह्यात असल्याचं कळालं. त्यानंतर पोलिसांची टीम तिथं पोहोचली आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपाचं नाव सोनू असून तो बीएनएम हायटेक अॅग्रो इंडस्ट्रीज राइस मिलमध्ये पोती शिवायचं काम करतो.

Nitish Kumar
NCP MLA Disqualification Result: राष्ट्रवादीच्या आमदारांचा आज फैसला! कोण ठरणार अपात्र; राहुल नार्वेकर देणार निकाल

दरम्यान, चौकशीमध्ये त्यानं सांगितलं की, बिहारमधील वाढती बेरोजगारी आणि गरिबीला तिथलं सरकारचं कारणीभूत आहे. त्याचं कुटुंब बिहारच्या हसनपूर इथल्या दयानगरमध्ये राहतं. सोनूनं पुढे सांगितलं की, धमकीच्या इतक्या क्लीप पाठवल्यानंतरही बिहारमध्ये कोणतीही हालचाल दिसून येत नसल्यानं आपलं या क्लीप्स माध्यमांना देणार होते. पण त्यापूर्वी त्याला ताब्यात घेण्यात आलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com