

Muzaffarpur Elderly Man Murder
ESakal
बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एका वृद्ध व्यक्तीला किरकोळ वादातून मारहाण करून ठार मारण्यात आल्याची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी आरोपीच्या घराबाहेर मृतदेह ठेवून गोंधळ घातला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जमावाला शांत केल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. निवडणुकीच्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.