esakal | Bihar Election: नितीशकुमार यांच्या प्रचारसभेत 'लालू यादव जिंदाबाद'च्या घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

nitish kumar main.jpg

सभेत लालू यादव यांच्या जय जयकाराच्या घोषणा होताच नितीशकुमार संतापले होते. 

Bihar Election: नितीशकुमार यांच्या प्रचारसभेत 'लालू यादव जिंदाबाद'च्या घोषणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा Bihar election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत येताना दिसत आहे. प्रचारसभांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. एकमेकांवर चिखलफेक होत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) तेजस्वी यादव यांच्या प्रचारसभांना मोठी गर्दी होत आहे. तेजस्वी यादव जेव्हा युवकांना 10 लाख सरकारी नोकरीचे आश्वासन देतात तेव्हा सभेत उत्साह संचारतो. दरम्यान, बुधवारी एक असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या प्रचारसभेत 'लालू यादव जिंदाबाद' च्या घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे नितीशकुमार प्रचंड संतापलेले व्हिडिओत दिसत आहेत. 

जेडीयूचे उमेदवार चंद्रिका राय यांच्या प्रचारसभेत हा प्रकार घडला. चंद्रिका राय हे अनेक वर्षे आरजेडीत होते. त्यानंतर ते जेडीयूत आलेले आहेत. त्यांच्या प्रचारसभेत नितीशकुमार बोलत होते. त्याचदरम्यान व्यासपीठाखालून 'लालू यादव जिंदाबाद' अशा घोषणा येऊ लागल्या. 'तुम्ही हे काय बोलत आहात? काय बोलत आहात? मुर्खासारखं बोलणाऱ्यांनी हात वर करावे', असे नितीशकुमारांनी म्हणताच सभेत शांतता पसरली. त्याचवेळी कोणीतरी 'चारा चोर, हा तो घोटाळा आहे ज्यामुळे लालू यादव जेलमध्ये आहेत,' असे म्हटले. 'एनडीटीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा- जगातील सर्वात धोकादायक जेल; क्रूरकर्मासुद्धा नाव ऐकून घाबरतात

त्यानंतर नितीशकुमार शांत होतील असे वाटत होते. परंतु, ते तिथेच थांबले नाहीत. ते म्हणाले, इथे गोंधळ घालू नका, जर तुम्हाला मला मत द्यायचं नसेल तर देऊ नका. तुम्ही ज्या कारणामुळे इथे आला आहात, आपण ज्या व्यक्तीसाठी आला आहात त्याची मते आपण नष्ट कराल, असे म्हटले. 

नितीशकुमार यांनी एका सभेत तेजस्वी यादव यांच्या 10 लाख सरकारी नोकरीची खिल्ली उडवली होती. पृथ्वीवर कोणीही हे अशक्य असलेले आश्वासन पूर्ण करु शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते. 

हेही वाचा- जून २०२१ पर्यंत चालेल अॅमेझॉनचे वर्क फ्रॉम होम

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांना प्रचारसभांदरम्यान नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. उपमुख्यमंत्री सुशील मोदी हेही 10 लाख सरकारी नोकरी देणे शक्य नसल्याचे सभांमधून सांगत आहेत.