
बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम श्रीकृष्ण सिंह यांच्या नावावर आहे. ते या पदावर 17 वर्षे 52 दिवस होते.
Bihar Election: दिवाळीनंतर नितीशकुमार घेऊ शकतात CM पदाची शपथ
पाटणा Bihar Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर सर्वांचे लक्ष आता सरकार स्थापनेकडे लागले आहे. पुढील आठवड्यात दिवाळीनंतर नवे सरकार गठीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर असलेले नितीशकुमार हे 16 नोव्हेंबर रोजी शपथ घेऊ शकतात असे बोलले जात आहे.
तत्पूर्वी, नोव्हेंबरच्या अखेरीस विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ते राज्यपालांकडे राजीनामा पाठवू शकतात. बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम श्रीकृष्ण सिंह यांच्या नावावर आहे. ते या पदावर 17 वर्षे 52 दिवस होते. नितीशकुमार या पदावर आतापर्यंत 14 वर्षे 82 दिवस आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या दोन दशकात सात वेळा या पदाची शपथ घेणारे मुख्यमंत्री ठरतील.
नितीशकुमार यांनी सर्वात पहिल्यांदा वर्ष 2000 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. परंतु, बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. वर्ष 2005 मध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत जेडीयूच्या खराब कामगिरीमुळे नैतिकतेचे कारण देत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, एक वर्षापेक्षा कमी कालावधीत ते पुन्हा सत्तेत परतले होते.
हेही वाचा- Bihar Election: 'हा काही शेवट नाही', पराभवानंतर शत्रुघ्नपुत्र लव सिन्हांची प्रतिक्रिया
वर्ष 2015 मध्ये नितीशकुमार यांच्या जेडीयूने लालूप्रसाद यांच्या आरजेडीबरोबर आघाडी करुन निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना विजय मिळाला होता. परंतु, तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे नाव एका घोटाळ्यात समोर आल्यानंतर त्यांनी पुन्हा 2017 मध्ये राजीनामा दिला होता. दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजपच्या साथीने नवे सरकार स्थापन केले होते.
हेही वाचा- सत्ता मिळूनही नितीश मौनात ; भाजपच्या वाढलेल्या ताकदीमुळे भूमिकेकडे लक्ष
यंदाच्या निवडणुकीत एनडीएने 243 पैकी 125 जागा जिंकल्या आहेत. तर महाआघाडीच्या खात्यात 110 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 74 तर जेडीयूला 43 जागा मिळाल्या आहेत. त्याचबरोबर एनडीएचे घटक पक्ष हिंदुस्तानी अवाम मोर्चाला 4 आणि विकासशील इन्सान पार्टीला 4 जागा मिळाल्या आहेत.
Web Title: Bihar Election 2020 Next Week Nitish Kumar Will Again Become Chief Minister
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..