बिहारच्या मंत्रिमंडळाची तऱ्हाच न्यारी! अर्थमंत्री बारावी पास तर घोटाळ्यातील नेत्याकडे शिक्षण खातं

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 18 November 2020

बिहारमधील विधानसभेत भाजपा-जदयूने विजय मिळवला आहे. महाआघाडीला या निवडणुकीत निसटता पराभव स्विकारावा लागला होता.

पटना: बिहारमधील विधानसभेत भाजपा-जदयूने विजय मिळवला आहे. महाआघाडीला या निवडणुकीत निसटता पराभव स्विकारावा लागला होता. मंगळवारी नितीश कुमारांसोबत इतर काही मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी स्वतःजवळ गृह, सामान्य प्रशासन, मंत्रिमंडळ सचिवालय अशी महत्वाची मंत्रीपदे घेतली आहेत. तर भाजपाच्या ताराकिशोर प्रसाद यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. प्रसाद यांना अर्थ, नगरविकास, पर्यावरण मंत्रालयांची जबाबदारी दिली आहे.

मागील वेळेस अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सुशील मोदी यांच्यावर होती, पण त्यांना यावेळेस कोणतंच मंत्रीपद दिलं गेलेलं नाही. नितीश कुमारांच्या नवीन सरकारमध्ये काही मंत्री कमी शिकलेले असूनही त्यांना महत्वाची मंत्रीपदे दिली आहेत. तसेच काही मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांचीही नोंदही आहे.

बिहारनंतर भाजपचे 'मिशन बंगाल'; ममतांना शह देण्यासाठी दोन मराठी शिलेदार

1) 12 वी पास ताराकिशोर प्रसाद यांच्याकडे अर्थमंत्रीपद-
प्रसाद यांच्याकडे 6 विभागांची जबाबदारी दिलेली आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेले ताराकिशोर प्रसाद यांच्याकडे अर्थ मंत्रालयासह नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. प्रसाद यांचे शिक्षण 12 वी पर्यंतच झालं आहे, तसेच त्यांना महत्वाची मंत्रीपदे दिल्याने याची मोठी चर्चा होत आहे. यापुर्वी राजदचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणारे तेजस्वी यादव यांच्या निवडीवर भाजपाने सडकून टीका केली होती. पण आता भाजपाचे नेते 12 वी पास नेते उपमुख्यमंत्री निवडल्याने राजदने भाजपावर निशाणा साधला आहे.

2) शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी-
- वादग्रस्त नेते
- कृषी विद्यालयात घोटाळा केल्याचा आरोप. 

Corona Updates: सावधान! संसर्ग पुन्हा वाढला; 24 तासांत 38 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

3) जीवेश मिश्रा-
-पर्यटन मंत्री
- कोरोनाकाळात नियमभंग केल्याचे आरोप

4) रेणु देवी- उपमुख्यमंत्री
पंचायतराज मंत्री

5) विजय चौधरी- ग्रामीण विकास मंत्रालय

 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election 2020 nitish kumar government minister oath