esakal | अपहरण-नरसंहार हवा असेल तर लालूंना मत द्या, विकासासाठी NDA ला साथ द्या- नितीशकुमार
sakal

बोलून बातमी शोधा

nitish kumar.jpg

आता गुन्हेगार भयभीत आहेत. पूर्वी जनता भयभीत होती. आता कुठे नरसंहार होत नाही ना अपहरण. लोक निर्भयपणे गुंतवणूक करत आहेत. गुन्हेगारीत बिहार देशात 23 व्या क्रमांकावर आहे. 

अपहरण-नरसंहार हवा असेल तर लालूंना मत द्या, विकासासाठी NDA ला साथ द्या- नितीशकुमार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा Bihar Election 2020- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा आरजेडीचे सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. जर बिहारमध्ये पुन्हा अपहरण, सामूहिक नरसंहार पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना (लालूप्रसाद यादव) मतदान करा. जर तुम्हाला पुन्हा बिहारमधून पलायन करायचे असेल तर मतदानच करु नका. पण जर बिहारमध्ये शांतता, विकास हवा असेल तर एनडीएच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. 

एनडीएच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. ते पुढे म्हणाले की, आम्हाला जेव्हापासून सेवा करण्याची संधी दिली. तेव्हापासून सातत्याने आम्ही काम करत आहोत. समाजातील प्रत्येक घटकासाठी आम्ही काम केले आहे. लोकांना पुढे नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. आम्ही बालकांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात पॉलिटेक्निक, आयटीआय, एएनएम संस्था सुरु होत आहेत. आता तर मेडिकल कॉलेजही होणार आहेत. 

हेही वाचा- कोरोनाचा कहर केव्हा संपेल? सरकार नियुक्त समितीने दिली चांगली बातमी

दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारीही लालूप्रसाद आणि राबडीदेवी यांच्यावर टीका केली होती. आता गुन्हेगार भयभीत आहेत. पूर्वी जनता भयभीत होती. आता कुठे नरसंहार होत नाही ना अपहरण. लोक निर्भयपणे गुंतवणूक करत आहेत. गुन्हेगारीत बिहार देशात 23 व्या क्रमांकावर आहे. 

हेही वाचा- काँग्रेस पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवणार आहे का?, भाजपचा सवाल

काही लोकांसाठी आपले कुटुंबूच सर्व काही असते. परंतु, माझ्यासाठी संपूर्ण बिहार माझा परिवार आहे. सुरुवातीच्या 5 वर्षांत जितके काम केले. त्याच्यापेक्षा अधिक पुढच्या पाच वर्षांत आणि त्यापेक्षाही अधिक पुढील पाच वर्षांत केले. अजून खूप काही करायचे बाकी आहे. तरीही काही लोक भ्रम निर्माण करत आहेत, असेही त्यांनी म्हटले.