esakal | Bihar Election : तिकीट न मिळाल्यामुळे नेत्याला अश्रू अनावर
sakal

बोलून बातमी शोधा

suresh yadav main.jpg

उमेदवारी न मिळाल्यामुळे कुटुंबीय नाराज झाले आहेत. त्यांच्या मनात राग आहे. त्यामुळे 19 ऑक्टोबर रोजी मी रक्सोलमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. आता जनताच निर्णय घेईल.

Bihar Election : तिकीट न मिळाल्यामुळे नेत्याला अश्रू अनावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा Bihar Election 2020 - बिहारमध्ये निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. परंतु, काही असेही नेते आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत होते. त्यांना पक्षाने तिकीटच दिलेले नाही. त्यामुळे अनेकांनी तर ऐनवेळी पक्ष बदल करत उमेदवारी मिळवली आहे. रक्सोल विधानसभा मतदारसंघातही असाच काहीसा प्रकार आरजेडीचे सुरेश यादव यांच्याबाबत घडला आहे. 

सुरेश यादव गेल्या 15 वर्षांपासून लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत आहेत. यावेळी त्यांनी निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली होती. परंतु, रक्सोल मतदारसंघ महाआघाडी काँग्रेसच्या खात्यात गेला. आरजेडीच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडीत काँग्रेसचा समावेश आहे. 

हेही वाचा- डोनाल्ड ट्रम्प बिहारला विशेष राज्याचा दर्जा देणार नाहीत, तेजस्वी यादव यांचा टोला

उमेदवारी न मिळाल्यामुळे सुरेश यादव हे अस्वस्थ झाले. त्यांनी बंडखोरी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना तर त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. रडतानाचा त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

सुरेश यादव म्हणाले की, उमेदवारी न मिळाल्यामुळे कुटुंबीय नाराज झाले आहेत. त्यांच्या मनात राग आहे. त्यामुळे 19 ऑक्टोबर रोजी मी रक्सोलमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. आता जनताच निर्णय घेईल.

हेही वाचा- तोंडावर मास्क, कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच शबरीमला मंदिरात प्रवेश

रक्सोलमधून काँग्रेसने रामबाबू यादव यांना तिकीट दिले आहे. दरम्यान, आरजेडीने दुसऱ्या पक्षातील अनेकांना उमेदवारी दिलेली आहे. जेडीयूनेही सुमारे अर्धा डझनहून अधिक उमेदवार आयात केले आहेत. तर माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांची कन्या सुभाषिनी यादव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना बिहारीगंजमधून उमेदवारी देण्यात आली आहे.