Congress review meeting chaos : बिहार निवडणुकीत दारुण पराभवामुळे दिल्लीत काँग्रेसच्या आढावा बैठकीत गोंधळ; नेत्यांमध्ये जोरदार वाद!

Congress review meeting chaos after Bihar election loss : पराभवाची कारणे तपासण्यासाठी गुरुवारी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती.
Congress Leadership Struggles to Control Meeting Disruptions

Congress Leadership Struggles to Control Meeting Disruptions

esakal

Updated on

Bihar Election Results and Congress Performance : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले आहे. ६१ जागांवर निवडणूक लढवून अवघ्या सहा जागांवर विजय मिळवता आलाय. यामुळे काँग्रेसला प्रचंड धक्का बसला आहे. तर पराभवाची कारणे तपासण्यासाठी गुरुवारी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दहा जणांच्या तुकड्यांमध्ये उमेदवार, खासदार आणि वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकले. मात्र बैठक सुरू होण्यापूर्वीच वातावरण तापले आणि नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरू झाल्याचे दिसून आले.

प्राप्त माहितीनुसार, वैशालीमधून निवडणूक लढवणारे संजीव सिंह यांनी बैठकीपूर्वी आरोपांची सरबत्ती केली. त्यांनी असा दावा केला की, बाहेरील उमेदवारांना तिकिटे देऊन अनेक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले गेले. शिवाय, "मैत्रीपूर्ण लढत"च्या नावाखाली अशा जागा देण्यात आल्या जिथे भाजपला स्पर्धेतून फायदा झाला.

Congress Leadership Struggles to Control Meeting Disruptions
Leopard Safety Tips : अचानक बिबट्या दिसला तर काय करायचं..? ; सुरक्षित राहण्यासाठी पाळा वनविभागाच्या 'या' सूचना

तर जेव्हा काही नेत्यांनी आरोपांवर आक्षेप घेतला तेव्हा वाद धमक्यांपर्यंत वाढला. संजीव सिंह यांनी रागाच्या भरात पूर्णियाचे उमेदवार जितेंद्र कुमार आणि इतर काही नेत्यांना गोळ्या घालण्याची धमकीही दिली. वाद चिघळत असल्याचे पाहून वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केला परिस्थिती शांत केली.

Congress Leadership Struggles to Control Meeting Disruptions
Hema Malini emotional Post : ''धरमजी माझ्यासाठी खूप काही होते...'' ; हेमा मालिनी भावनिक पोस्ट करत पहिल्यांदाच झाल्या व्यक्त, म्हणाल्या...

दरम्यान, राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पक्षातील अनुशासनहिनता खपवून घेतली जाणार नाही. तर बैठकीत पराभवाची अनेक कारणे चर्चेत आली. नेत्यांनी तिकीट वाटपात अनियमितता असल्याचा आरोप केला आणि अनेक उमेदवारांना पैशाच्या बदल्यात तिकिटे देण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com