Bihar Election : बिहारमध्ये 'जंगलराज'वाले आणि नक्षलवादी एकत्र; मोदींची महाआघाडीवर टीका

modi in motihari
modi in motihari

मोतिहारी, बिहार : विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. आज नरेंद्र मोदींनी बिहारमधील मोतिहारीमध्ये प्रचारसभेला संबोधित केलं आहे. या सभेत त्यांनी विरोधकांवर कडाडून हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलंय की, राज्यात जंगलराजची अवस्था होती, तेंव्हा उद्योग, साखर कारखाने दशकांपासून चंपारण्य आणि बिहारचा भाग होती ती देखील आता बंद झाली आहे. आतातर या निवडणुकीत जंगलराजवाल्यांसोबत नक्षलवादाचे समर्थक आणि देशाचे तुकडे तुकडे पाडू इच्छिणारे देखील सामिल झाले आहेत. 

बिहारच्या महिला, माता-भगिनींना उघड्यावर शौचाला जावं लागायचं. त्यांच्या सुरक्षेला धोका होता. मात्र, या जंगलराजवाल्यांना जंगलासारखीच स्थिती हवी होती. एनडीएच्या सरकारने बिहारच्या माता-भगिनींसाठी लाखो शौचालये बनवून त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. जंगलराजचा तो अंधार आता बिहारने मागे टाकला आहे. आता नव्या उजेडासह डबल इंजिनच्या ताकदीने विकासाचा लाभ आपल्याला बिहारच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसचे संकट जेंव्हापासून देशांत आले तेंव्हा सर्वांत आधी खेडोपाड्यातील गरीब आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला गेला. कोरोनाचे हे संक्रमण खेडोपाड्यात पोहचू नये यासाठी योग्यवेळीच लॉकडाऊन लावला गेला. गरीब परिवारांना उपाशी झोपायला लागू नये म्हणून दिवाळी आणि छठ पूजा पर्यंत मोफत रेशनची सोय उपलब्ध केली. त्यांनी म्हटलं की, बिहारचे जे कामगार कुंटुंब दुसऱ्या राज्यातून परतले आहेत त्यांच्या रेशन धान्यापासून ते रोजगारापर्यंतच्या सर्व गोष्टी या दरम्यान गरीब कल्याण रोजगार अभिनयानाद्वारे चालवल्या गेल्या. लॉकडाऊन दरम्यान पेरणी व खरेदी तसेच पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक आवश्यक ती सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.

रोजगाराच्या मुद्यावर पंतप्रधान मोदींनी म्हटलं की बिहारच्या युवकांसाठी बिहारमध्येच चांगला आणि सन्मानजनक रोजगार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न हा आहे की हा रोजगार कोण मिळवून देऊ शकतो? ते लोक ज्यांनी बिहारला अंधाराची आणि अपराधाची ओळख बनवून ठेवली. ते लोक ज्यांच्यासाठी रोजगार देणे म्हणजे कोट्यवधी रुपये कमावण्याचे साधन आहे? असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली. 

एनडीएला मत देण्याचे आवाहन करत त्यांनी म्हटलं की, बिहारला अप्रगत होण्यापासून वाचवण्यासाठी, बिहारला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रत्येक परिवाराचा, आणि प्रत्येक मतदाराचे मत एनडीएला म्हणजेच भाजपा, जेडीयू, हम पार्टी आणि व्हीआयपी पार्टीच्या उमेदवारांना मिळायले हवे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com