esakal | बिहारचा रणसंग्राम : चर्चेनंतरही तिढा कायम
sakal

बोलून बातमी शोधा

politics

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) नाराज असलेल्या लोकजनशक्ती पक्षाचे (एलजेपी) नेते चिराग पासवान यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी अनुक्रमे काल व आज चर्चा केली. मात्र जागा वाटपाच्या पेचावर तोडगा निघू शकला नाही.

बिहारचा रणसंग्राम : चर्चेनंतरही तिढा कायम

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) नाराज असलेल्या लोकजनशक्ती पक्षाचे (एलजेपी) नेते चिराग पासवान यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी अनुक्रमे काल व आज चर्चा केली. मात्र जागा वाटपाच्या पेचावर तोडगा निघू शकला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिराग यांच्यासमोर भाजपने २७ जागांचा प्रस्ताव ठेवल्याचे समजते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाबरोबर (जेडीयू) बिनसल्याने चिराग यांच्यासमोर फारसे पर्यायही नाहीत. ‘एनडीए’मध्ये राहायचे की बाहेर पडायचे याचा निर्णय ते आगामी दोन दिवसांत जाहीर करण्याची शक्यता आहे. 

लोकप्रिय मुख्यमंत्री योगींच्या उत्तर प्रदेशात महिलांचे अस्तित्व धोक्यात!

बिहार निवडणुकीतील २८ ऑक्‍टोबरला होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली तरी सत्तारूढ ‘एनडीए’मधील धुसफूस थांबत नसल्याचे पाहून भाजप नेतृत्वाने व गृहमंत्री शहा यांनी स्वतःच याबाबत पुढाकार घेतला. ‘एलजेपी’चे संस्थापक व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान गंभीर आजारी असून अतिदक्षता विभागात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पुत्र चिराग यांच्यावर पक्षाची जबाबदारी आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणारी ही पहिलीच निवडणूक ठरणार आहे. सत्तारूढ ‘जेडीयू’च्या संतप्त भूमिकेमुळे चिराग यांनी वेगळा मार्ग स्वीकारण्याचे सूतोवाच केले होते. 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

महाआघाडीतही वाद

  • काँग्रेला ५८ जागा देण्याची ‘आरजेडी’ची भूमिका
  • काँग्रेसला ७० जागा हव्या
  • माकप २० जागांवर ठाम, त्यांना हव्या दहा जागा, अन्यथा स्वबळावर ७० जागा लढविण्याचा इशारा

...म्हणून नवरी झाली विवाहापूर्वीच व्हायरल

उपेंद्र कुशवाह महाआघाडीतून बाहेर 
माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पक्षाने (आरएलएसपी) महाआघाडीतून बाहेर पडले आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षासह (बसप) तिसरी आघाडी तयार करणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. ही आघाडी कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहे. कुशवाह हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्याही संपर्कात होते.

पण जागा वाटपावर एकमत न होऊ शकले नाही. नव्या आघाडीत जनवादी (समाजवादी) पक्षही सामील झाला आहे. कुशवाह यांच्या घोषणेनंतर बिहारच्या राजकारणात अजून एक आघाडी तयार झाला आहे. तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीनंतर कुशवाह यांनी सर्व २४३ जागा लढविण्याची घोषणा केली. चिराग पासवान यांनीही या आघाडीत सहभागी व्हावे, असे निमंत्रण त्यांनी दिले.

Edited By - Prashant Patil

loading image