esakal | बिहार रणसंग्राम : नेत्यांच्या जुगलबंदीने प्रचाराची सांगता
sakal

बोलून बातमी शोधा

Nitishkumar-and-tejashwi

‘बिहारमध्ये रोजगारासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ने अनेक कामे केली आहेत. दहा लाख बेरोजगारांसाठी प्रशिक्षण दिले आहे. ‘जीविका’च्या (बिहार ग्रामीण उपजीविका योजना) माध्यमातून २० लाख महिलांना जोडून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे,’’ असे सांगून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दला (आरजेडी)चे नेते तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला.

बिहार रणसंग्राम : नेत्यांच्या जुगलबंदीने प्रचाराची सांगता

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नितीश व तेजस्वी यांची एकमेकांवर टीका; महागाई, बेरोजगारीचे मुद्दे गाजले
पाटणा - ‘बिहारमध्ये रोजगारासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ने अनेक कामे केली आहेत. दहा लाख बेरोजगारांसाठी प्रशिक्षण दिले आहे. ‘जीविका’च्या (बिहार ग्रामीण उपजीविका योजना) माध्यमातून २० लाख महिलांना जोडून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे,’’ असे सांगून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दला (आरजेडी)चे नेते तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सर्व पक्षांनी सभांमधून विरोधकांवर निशाणा साधत सत्तेवर येण्याचा दावा केला.  राज्यातील पहिल्या टप्प्यातील प्रचार आज समाप्त झाला. मुझफ्फरनगरमधील सभेत नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, की बिहारचा अर्थसंकल्प २४ हजार कोटी रुपयांचा होता. आता तो दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. बिहारमधील गुन्हेगारीवर आम्ही नियंत्रण आणले असून यात आपल्या राज्याचा क्रमांक २३ वे स्थान आहे. आमचे लक्ष कामावर आहेत तर अनेक जण प्रचारावरच जोर देत आहेत.

पोलिसांना दाढी ठेवण्यासाठी घ्यावी लागणार परवानगी; योगी सरकारचा मोठा निर्णय

नितीश कुमार यांची आश्‍वासने

  • पाच तासांत राजधानीत पोचण्याचे लक्ष्य
  • प्रत्येक जिल्ह्यात तंत्रज्ञान संस्था सुरू करणार
  • विद्यार्थी क्रेडिट कार्डावर चार लाख रुपये देणार
  • जनतेच्या मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार 

कांदा भाववाढीवर भाजप गप्प
‘महागाईची समस्या गंभीर आहे. भाजप नेत्यांना कांद्याचे हार घालण्याची सवय झाली आहे. पण आता कांदा १०० रुपये किलो झाला आहे. कांदा जेव्हा ५० ते ६० रुपये किलो होता तेव्हा त्यावर बोलणारे लोक आता गप्प बसले आहेत. शेतकरी उद्‍ध्वस्त होत आहेत. युवक बेरोजगार आहेत आणि उपासमारी वाढत आहे,’’ अशी टीका राष्ट्रीय जनता दला (आरजेडी)चे नेते तेजस्वी यादव यांनी सोमवारी भाजपवर टीका केली.

बिहारच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तेजस्वी यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘‘ कांद्याचे भाव ८० रुपयांवर गेले आहेत. मात्र आधी ५०-६० रुपये भाववाढ झाली तरी गदारोळ करणारे भाजप नेते आता गप्प बसले आहेत. बेरोजगारी, उपासमारी वाढत असून गरिबीचा विळखा घट्ट होत आहे. शेतकरी, छोटे व्यापारी देशोधडीला लागत आहेत. सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) घसरले आहे. आपण आर्थिक गर्तेत अडकत आहोत.

दिल्लीत ‘टू प्लस टू’ चर्चा; अमेरिकेचे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री भारतात दाखल

पहिल्या टप्प्यातील ७१ जागांसाठी उद्या मतदान
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाली. १६ जिल्ह्यांमधील ७१ जागांसाठी बुधवारी (ता.२८) मतदान होईल. आठ मंत्र्यांसमवेत अनेक दिग्गजांचे भवितव्य उद्या मतदान पेटीत बंदिस्त होणार आहे. 

पहिल्या टप्प्यात शिक्षण मंत्री कृष्णनंदन प्रसाद वर्मा हे जहानाबाद मतदारसंघातून उभे आहेत. कृषी मंत्री प्रेम कुमार, ग्रामीण कार्य मंत्री शैलेश कुमार, विज्ञान मंत्री जय कुमारसिंह, महसूल मंत्री  रामनारायण मंडल, कामगार मंत्री विजय कुमार सिन्हा, खणीकर्म मंत्री बृजकिशोर बिंद, परिवहन मंत्री संतोष कुमार निराला आदी मंत्री रिंगणात आहे. याशिवाय हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम)चे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी हेही रिंगणात आहेत. भारतीय नेमबाज व भाजपची उमेदवार श्रेयसीसिंह, काँग्रेसचे नेते 
- अनंतसिंह, लोकजनशक्तीचे राजेंद्रसिंह, भगवानसिंह कुशवाह हेही मैदानात आहे. 

Edited By - Prashant Patil