esakal | Bihar Election Update:भाजप, जेडीयू सत्तेकडे, यादवांमुळे निवडणूक 'तेजस्वी'
sakal

बोलून बातमी शोधा

bihar election result tejashwi yadav factor

बिहारच्या निवडणुकीत सुरुवातीला अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणाचा मुद्दा चर्चेत होता. ना भुलेंगे ना भूलने देंगे, अशा आशयाची पोस्टर्स बिहारमध्ये निवडणुकीपूर्वीच लावण्यात आली होती.

Bihar Election Update:भाजप, जेडीयू सत्तेकडे, यादवांमुळे निवडणूक 'तेजस्वी'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पाटणा : बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेसच्या महाआघाडीला सकारात्मक कल मिळत असल्याचे दिसले होते. परंतु, काही तासांत चित्र बदललं आणि भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या (JDU)राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं पिछाडी भरून काढून, सत्तेच्या दिशेने कूच केली आहे. 

आणखी वाचा - बिहार सत्तेची मॅजिक फिगर कोणाच्या हातात?

बिहार निवडणुकीचे मुद्दे
बिहारच्या निवडणुकीत सुरुवातीला अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणाचा मुद्दा चर्चेत होता. ना भुलेंगे ना भूलने देंगे, अशा आशयाची पोस्टर्स बिहारमध्ये निवडणुकीपूर्वीच लावण्यात आली होती. निवडणूक जसजशी पुढं सरकत गेली तसा सुशांतचा मुद्दा मागे पडत गेला आणि बिहारच्या मूळ प्रश्नांचे विषय पुढे येत गेले. यात प्रामुख्यानं बेरोजगारीचा मुद्दा पुढे आला. बिहारमधून मोठ्या प्रमाणावर होत असणारे मजूर, कामगारांचे स्थलांतर हा विषय उपस्थित झाल्यानं, त्या मुद्द्या भोवती निवडणूक फिरताना दिसत होती. त्याच दरम्यान भाजपने मोफत कोरोना लशीची घोषणा केल्यानंतर त्यावर देशभरातील विरोधी राजकीय पक्षांनी टीका केली. त्या घोषणेचा परिणाम निवडणुकीवर किती झाला? याविषयी अद्याप भाष्य करता येणार नाही. 

तेजस्वी यादव यांची कमाल
तेजस्वी यादव यांनी बिहारच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने जान आणली. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक तेजस्वी यादव यांच्या झंजावाती प्रचारामुळं चर्चेत आली. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला ज्या काही जागा मिळताना दिसत आहेत. त्या केवळ तेजस्वी यादव यांच्या प्रभावामुळं मिळत असल्याचं दिसत आहे. तेजस्वी यादव यांनी राज्यभरात घेतलेल्या सभांना तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. तेजस्वी यांनी तरुणांचा बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून, बिहारच्या मूळ प्रश्नांना हात घातला होता. परिणामी एकतर्फी निवडणूक चुरशीची झाली. 

आणखी वाचा - बिहारचे माजी मुख्यमंत्रीच पडले पिछाडीवर!

तेजस्वी यादवांनी काय केले?

  • तरुणांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर भर दिला
  • भावनेच्या राजकारणाला बगल दिली
  • आक्रमक सभांनी प्रचाराचे मैदान गाजवले 
  • लालू प्रसाद यादव यांच्या पेक्षाही जास्त सभा घेऊन रान उठवले 

काँग्रेसची साथ मिळाली नाही!
तेजस्वी यादव यांनी ज्या पद्धतीनं बिहारच्या निवडणुकीत रान उठवलं, तसं काँग्रेसला साध्य करता आलं नाही. परिणामी तेजस्वी यादव यांना मित्रपक्ष म्हणून जी साथ हवी होती ती मिळाली नाही. काँग्रेस 20-25 जागांवर अडखळल्यामुळं तेजस्वी यादव यांना सत्तेपासून दूर रहावं लागलं.