
RJD Leader Protests Outside Lalu Yadav’s House Over 2.7 Crore Ticket Demand
Esakal
बिहार विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता उमेदवार जाहीर केले जात आहेत. तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेल्या नेत्यांकडून उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. तर काही नेत्यांनी थेट वरिष्ठ नेत्यांच्या दारात ठिय्या मांडल्याचे प्रकारही समोर आले होते. दरम्यान, आरजेडीच्या एका नेत्यानं लालु प्रसाद यांच्या निवासस्थानासमोर गोंधळ घातला.मदन शाह असं नेत्याचं नाव असून ते मधुबन मतदारसंघातून तिकिटाचा दावेदार मानले जात होते. त्यांनी लालु प्रसाद यादव यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू केलंय.