Bihar Exit Poll - नितीश कुमार यांची धाकधूक वाढली; सत्तांतर होण्याची शक्यता

bihar election exit poll nitish kumar jdu rjd congress bjp
bihar election exit poll nitish kumar jdu rjd congress bjp

पाटणा - बिहारमध्ये 243 विधानसभेच्या जागेसाठी निवडणूक (Bihar Election) पार पडली. यामध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान शनिवारी झाले. याचे निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहेत. दरम्यान, एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये (Bihar Exit Poll) त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रिपब्लिक भारत जन की बातच्या एक्झिट पोलमध्ये महाआघाडी सत्ता काबीज करू शकते असं म्हटलं आहे. त्यांच्या एक्झिट पोलमध्ये महाआघाडीला 138 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नितिश कुमार (CM Nitish Kumar) यांना धक्का बसू शकतो. 

एनडीएला 104 ते 128 जागा मिळतील असा अंदाज एबीपीच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. यात जदयूला 38 ते 46 तर भाजपला 66 जागा मिळतील असं म्हटलं आहे. दुसरीकडे महाआघाडीला 108 ते 131 जागा मिळू शकतात. यात रादजला 81 ते 89 तर काँग्रेसला 21 ते 29 जागी विजय मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर 6-13 जागी महाआघाडीचे उमेदवार विजयी होतील असंही म्हटलं आहे.

रिपब्लिक - जनकी बातच्या एक्झिट पोलने महाआघाडीची सत्ता येईल असे संकेत दिले आहेत. त्यानुसार नितिश कुमारांच्या एनडीएला धक्का बसू शकतो. एनडीएला 91 ते 117 जागा तर महाआघाडीला 118 ते 138 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे एलजेपीला 5 ते 8 आणि इतर 3 किंवा 6 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. 

ईटीजी Exit Poll 
एनडीए - 114
युपीए - 120
एलजेपी - 03
इतर - 06


टीव्ही 9 भारत Exit Poll
एनडीए - 115 
महाआघाडी - 120
एलजेपी - 04
इतर - 05

बिहार विधानभेत 243 जागा असून बहुमतासाठी 122 जागांची गरज आहे. टाइम्स नाऊ सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार महाआघाडीला 120 तर एनडीएला 116 जागा मिळतील असं म्हटलं आहे. यामुळे बहुमताचा जादुई आकडा मिळवण्यासाठीचं गणित फिस्कटण्याची चिन्हे दिसत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com