Sushil Kumar Modi Cancer: सुशील मोदी कँन्सरने ग्रस्त, सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हणाले, 'गेल्या ६ महिन्यांपासून...'

Sushil Kumar Modi Cancer: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी हे कर्करोगाशी लढा देत आहेत. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
Sushil Kumar Modi Cancer
Sushil Kumar Modi CancerEsakal

Sushil Kumar Modi Cancer: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहून सर्वांना धक्का दिला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आपण कॅन्सरसारख्या घातक आजाराने ग्रस्त असून, त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी लिहिले आहे.

सुशील कुमार मोदी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. सुशील मोदी म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींना सांगितले आहे.

Sushil Kumar Modi Cancer
Rajiv Gandhi Assassination Case: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची भारतातूनही सुटका; मायदेश श्रीलंकेकडं रवानगी

सुशील मोदींनी केली भावनिक पोस्ट

गेल्या ६ महिन्यांपासून मी कॅन्सरशी झुंज देत आहे. आता सर्वांना सांगण्याची वेळ आली आहे, असे मला वाटले. लोकसभा निवडणुकीत मी काहीही करू शकणार नाही. मी पंतप्रधान मोदींना सांगितले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देश, बिहार आणि पक्ष यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, अशी पोस्ट त्यांनी सोशल मिडीयावर केली आहे.

Sushil Kumar Modi Cancer
Arvind Kejriwal: तिहारमध्ये केजरीवालांचं वजन 5 किलोंनी घटलं! डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

सुशील मोदी हे बिहारच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. बिहार राज्यातील भाजपचे मोठे नेते मानले जातात. ते 2005 ते 2013 पर्यंत सतत बिहार सरकारचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री राहिले आहेत. त्यानंतर जेव्हा नितीश कुमार एनडीएमध्ये परतले तेव्हा ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले होते.

Sushil Kumar Modi Cancer
Kharge letter to Manmohan Singh: आर्थिक सुधारणा अन् मनमोहन सिंगांनी लावलेली शिस्त; निवृत्तीनंतर खर्गेंचं खास पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com