
बिहार विधानसभेचं बिगुल वाजल्यानंतर आता एनडीएने सीट शेअरिंग फॉर्म्युला जाहीर केलाय. एनडीएच्या जागावाटपासाठी नवी दिल्लीत मॅरेथॉन बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. एनडीएच्या जागावाटपाची माहिती पत्रकार परिषदेत न करता सोशल मीडियावरून एनडीएतील सहकारी पक्षांनी माहिती दिलीय. जदयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा, आरएलएमचे प्रमुख उपेंद्र कुशवाह, केंद्रीय मंत्री चिराग पावसान, बिहार भाजपचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी रविवारी जागावाटपाबाबत ट्विट केले आहे.