राजकारणात उलथापालथ! शरद यादवांचा LJD लालू यादवांच्या पक्षात विलीन होणार

Lalu Prasad Yadav Sharad Yadav
Lalu Prasad Yadav Sharad Yadavesakal
Summary

बिहारच्या राजकारणात रोज चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

बिहारच्या (Bihar) राजकारणात रोज चढ-उतार पाहायला मिळत आहेत. नुकताच मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा (Vijay Kumar Sinha) यांच्यातील वाद कसातरी संपुष्टात आलाय. आता लोकतांत्रिक जनता दलाचे (LJD) अध्यक्ष शरद यादव (Sharad Yadav) यांनी मोठी घोषणा केलीय.

शरद यादव लवकरच त्यांच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दलात (RJD) विलीनीकरण (Rashtriya Janata Dal) करणार आहेत. खुद्द शरद यादव यांनी ही माहिती दिलीय. शरद यादव यांनी 20 मार्च रोजी अधिकृतपणे त्यांचा पक्ष (Loktantrik Janata Dal) राजदमध्ये विलीनीकरण करणार असल्याचं सांगितलंय. यानिमित्तानं त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक कार्यक्रम होणार असल्याचंही यादव म्हणाले.

Lalu Prasad Yadav Sharad Yadav
राजकारण तापलं! पराभवानंतर अकाली दलात फूट

लालू यादव यांनी 3 ऑगस्ट 2021 रोजी नवी दिल्लीत शरद यादव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शरद यादव यांनी लालूंशी राजकीय विषयांवर खुलेपणानं भाष्य केलं होतं. दरम्यान, नितीश कुमार यांच्याशी असलेल्या राजकीय मतभेदामुळं शरद यादव यांनी JDU मधून बंडखोरी करून 2018 मध्ये लोकतांत्रिक जनता दल नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. शरद यादव यांच्यासह अली अन्वरसह अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर शरद यादव यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही मधेपुरा येथून आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, जेडीयूच्या दिनेश्वर यादव यांच्याकडून त्यांचा 1 लाख मतांनी पराभव झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com