Harmeet Singh Kalka
Harmeet Singh Kalkaesakal

राजकारण तापलं! पराभवानंतर अकाली दलात फूट

Summary

कालका यांच्या या घोषणेनंतर एसएडीनं बैठक बोलावून त्यांची पक्षातून हकालपट्टी केलीय.

पंजाबमधील (Punjab Assembly Election) दारूण पराभवानंतर आता शिरोमणी अकाली दलातही (Shiromani Akali Dal) फूट पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरमीत सिंह कालका (Harmeet Singh Kalka) यांनी स्वतंत्र अकाली दल स्थापन करण्याची घोषणा केलीय. अन्य 26 सदस्यांसह हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. या पक्षानं 47 पैकी 27 सदस्यांसह DSGMC ची निवडणूक जिंकली होती.

Harmeet Singh Kalka
'योगींच्या भगव्या कपड्यांवर कोणी का आक्षेप घेत नाही?'

कालका यांच्या या घोषणेनंतर एसएडीनं बैठक बोलावून त्यांची पक्षातून हकालपट्टी केलीय. याशिवाय पक्षाच्या दिल्ली युनिटचं विलीनीकरण करण्यात आलंय. सध्या माजी अध्यक्ष अवतार सिंह या युनिटची कमान सांभाळतील, असं अकाली दलाचे उपाध्यक्ष प्रेमसिंह चंदूमाजरा (Prem Singh Chandumajra) यांनी सांगितलंय. अकाली दलाचे उमेदवार आणि पंजाबमधील भटिंडा शहरातील माजी आमदार सरूप सिंहला यांनीही पक्षाचा राजीनामा दिलाय. त्यांनी बादल कुटुंबावर आरोप करत काँग्रेस नेते मनप्रीत सिंह बादल (Manpreet Singh Badal) यांच्यावर टीका केलीय. या मतदारसंघात आम आदमी पक्षाचा उमेदवार विजयी झालाय.

Harmeet Singh Kalka
भारताच्या न्यायाधीशानं रशियाच्या विरोधात केलं मतदान

पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आप पक्षाची त्सुनामी आली होती. आप पक्षानं (Aam Aadmi Party) पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपचाही सुपडा साफ केला. पंजाबमधील जनतेनं आप पक्षाच्या बाजूनं कौल दिला असून धक्कादायक बाब म्हणजे, पंजाबमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसलाय. पंजाबमध्ये 92 जागांवर आप आले आहे. त्यामुळं आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची काल शपथ घेतलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com