
Nitish Kumar and Chirag Paswan during previous NDA meeting — now facing a political showdown over seat-sharing in Bihar.
esakal
Nitish Kumar’s JDU Challenges LJP in Bihar Elections : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सत्ताधारी एनडीए आघाडीचं जागा वाटप झालं आहे, तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून जागा वाटप जाहीर झालेलं नाही. दरम्यान, नितीश कुमारांच्या जेडीयूने १४ उमेदवारांना पक्षाचे चिन्ह वाटप केले आहे. मात्र हे करताना नितीशबाबूंनी मोठा खेला केल्याचे समोर आले आहे.
कारण, नितीश कुमार यांनी एनडीए आघाडीतील सहकारी पक्ष असलेल्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीच्या जागांवरही जेडीयूच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामुळे निवडणुकीआधीच एनडीए आघाडीत खेला झाल्याचे समोर आले आहे.
जागावाटपात चिराग पासवान यांना ज्या जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी तीन जागांवर नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या उमेदवारांची घोषणा केली गेली आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. यावर अद्याप चिराग पासवान यांच्या पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र नितीश कुमार यांच्या पक्षाचा हा निर्णय़ एनडीए आघाडीत फूट निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतो, असे बोलले जात आहे.
चिराग पासवान यांच्यासाठी जेडीयूने ज्या तीन जागांवर उमेदवार उभे केले आहेत त्यात गायघाट, राजगीर आणि सोनबरसा यांचा समावेश आहे. गायघाटमध्ये, नितीश कुमार यांनी केवळ चिराग पासवान यांची जागाच घेतली नाही तर त्यांचा उमेदवारही घेतला आहे आणि त्याला पक्षाचे चिन्हही दिले आहे. जेडीयूने लोजपा खासदार वीणा देवी यांची मुलगी कोमल सिंग यांना जेडीयूकडून उमेदवारी दिली आहे.
तर, राजगीरची जागा चिराग पासवान यांच्या एलजेपीला देण्यात आली होती, परंतु नितीश कुमार यांनी स्वतःचा उमेदवार उभा केला आहे. जेडीयूने आपले चिन्ह कौशल किशोर यांना दिले आहे. तर नितीश कुमार यांनी सोनबरसा मतदारसंघासाठी रत्नेश सदा यांना पक्षाचे चिन्ह दिलेले आहे.
प्राप्त माहितीनुसार नितीश कुमार जागा वाटपाबाबत या तीन जागांसह तारापूरवरच्या जागेच्या निर्णयावर नाराज आहेत. ज्यामुळे वाद निर्माण झालेला आहे. भाजपने तारापूर मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. माहितीनुसार, तारापूरच्या बदल्यात भाजपने नितीश कुमारांच्या जेडीयूला बरौलीची जागा दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.