
MRF stock comparison : शेअर बाजारात कधी कोणता शेअर धुमाकूळ माजवेल अन् आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवेल हे सांगता येत नाही. याची अनेक उदाहरणं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सध्या आपण अशाच मल्टीबॅगर स्मॉल स्टॉक Elcid Stock बद्दल बोलत आहोत. जो एका झटक्यात अवघ्या ३ रुपयांवरून थेट ३००००० रुपयांवर जावून पोहचला. मात्र हा उच्चांक गाठल्यानंतर यामध्ये प्रचंड घसरणही दिसून आली. जर सध्याच्या परिस्थिती बघितली तर प्रचंड घसरण होवूनही, हा स्टॉक देशातील सर्वात महागडा स्टॉक MRF शेअरच्या अगदी जवळ आहे.
मागील वर्षी २०२४मध्ये Elcid Shareचे नाव शेअर बाजारात चर्चेत होते. कारण, या पेनी स्टॉकने एकप्रकारे चमत्कारच घडवला होता. २१ जून २०२४ पर्यंत या शेअरची किंमत अवघी ३.५३ रुपये होती, पण नंतर त्यात इतकी वाढ झाली की शेअरची किंमत तब्बल ३ लाख रुपयांच्याही पुढे गेली आणि शेअऱचा भाव ३,३२३९९.९४ रुपये झाला. परिणामी एमआरएफला पिछाडीवर टाकत हा देशातील सर्वात महागडा स्टॉक बनला. मात्र यानंतर यामध्ये प्रचंड घसरण सुरू झाली आणि तो १,२४,२०० रुपयांपर्यंत आला. परंतु मागील काही दिवसांमध्ये यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आणि तो आता MRF Stock Priceच्या जवळ पोहचला आहे.
सर्वात मोठी गोष्टी म्हणजे, एकीकडे मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेड (MRF Ltd) ही ६०४४० कोटी रुपयांची मार्केट कॅप असणारी कंपनी आहे. तर एलसिड मार्केट कॅप या किमतीच्या मूल्यावर २८४० कोटी रुपये आहे. मात्र तरीही ती देशातील सर्वात महागड्या स्टॉकशी स्पर्धा करत आहे.
आठवड्याच्या सुरुवातीस कामकाजाच्या पहिल्या दिवशी एलसिड स्टॉकच्या स्थिताबाबत बोलायचं झालं तर, दुपारी साधारण दोन वाजेपर्यंत त्याची किंमत १००६ रुपयांनी घसरून, १,४१,५०१ रुपयांवर व्यवहार करत होता. तेच जर एमआरएफच्या शेअरबद्दल बोलायचं झालं तर हा स्टॉक १५५० रुपयांच्या घसरणीसह १,४२,४२० रुपयांवर व्यवहार करत होता. यावरून आपल्या लक्षात येतं की, एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर एमआरएफ पेक्षा केवळ ९१९ रुपये स्वस्त आहे.
रातोरात गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या अशा स्टॉक्सबद्दल तज्ज्ञांचे मत आहे की, हे धोकादयक असू शकतं. मागील वर्षी जेव्हा हे Elcid Stock शिखरावर पोहचला होता, तेव्हा वेल्थमिल्स सिक्योरिटीजमध्ये इक्विटी स्ट्रॅटेजी डायरेक्टर क्रांती बाथनी यांनी गुंतवणुकदारांना सल्ला देत म्हटले होते की, अशा कंपनींच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे पूर्णपणे गुंतवणूकदारांच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. कारण हे लक्षात ठेवावे लागते की त्यामध्ये लिक्विडिटी रिस्क असू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.