esakal | कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री 83 दिवस घरात? लालूंचा भोजपुरी भाषेत टोला
sakal

बोलून बातमी शोधा

lalu prasad yadav

लालू प्रसाद यादव यांनी ट्विटरवर विचारले की, कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री ८३ दिवसांपासून घराबाहेर पडला नाही? कोणाला समजले तर मला सांगा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री 83 दिवस घरात? लालूंचा भोजपुरी भाषेत टोला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा, ता. ८ : चारा गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले माजी मुख्यमंत्री, राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून युद्धाच्या प्रसंगी रणभूमीतून पळून गेले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. लालू प्रसाद यादव यांनी ट्विटरवर विचारले की, कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री ८३ दिवसांपासून घराबाहेर पडला नाही? कोणाला समजले तर मला सांगा, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

नितीशकुमार यांच्यावर टीका करण्यासाठी लालू प्रसाद वेगवेगळ्या शैलीचा अवलंब करत आहेत. यापूर्वी त्यांनी कवितेच्या माध्यमातून टीका केली होता. आता कोड्यात टाकणारे प्रश्‍न विचारत आहेत. लालूप्रसाद यादव सध्या झारखंडची राजधानी रांची येथे रिम्स येथे उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे टीका करताना लालूप्रसाद यादव यांनी एकदाही नितीशकुमार यांचे नाव घेतलेले नाही.

भल्या भल्यांना जमलं नाही ते न्यूझिलंडने करुन दाखवलं; देश कोरोनामुक्त?

भोजपूरी भाषेत ट्विट केले असून त्यात म्हटले की, कोरोना जरी अद्याप कमी झाला नसला तरी, मंत्रिमहोदय मात्र नागरिकांना वाऱ्यावर सोडून पळून गेले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत याचा हिशोब केला जाईल. यादरम्यान, बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होत असून राजदचे नेते लालूप्रसाद यादव हे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्यातील राजकारणात लालूप्रसाद यादव हे मैदानातून पळ काढणाऱ्या म्हणीचा उपयोग प्रतिस्पर्धी नितीशकुमार यांच्यासाठी करत आहेत. 

आठ वर्षांत भारतात ७५० वाघांचा मृत्यू; राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाची माहिती

दरम्यान, जेडीयू प्रवक्ते राजीव रंजन यांनी लालूंच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी लालू प्रसाद यादव यांना आधुनिक राजकारणातील धृतराष्ट्र असं म्हटलं आहे. राजीव रंजन म्हणाले की,'लालू प्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करण्याआधी स्वत:च्या मुलाकडं बघावं. तेजस्वी यादव संकटाच्यावेळी नेहमची बेपत्ता असतात ते लालू प्रसाद यादव यांना दिसत नाही.'

सोनिया गांधींच्या आग्रहाला माजी पंतप्रधानांनी दिला मान; लढणार राज्यसभा निवडणूक

बिहारमधील 21 जिल्ह्यात सोमवारी एकूण 105 नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 5175 इतकी झाली आहे. यातील 72 टक्के लोक हे दुसऱ्या राज्यातून आले आहेत. जवळपास 21 लाख प्रवासी बिहारमध्ये परतले असून आतापर्यंत 99 हजार 108 कोरोना चाचण्या झाल्या. यात बाहेर न गेलेल्यांचाही समावेश आहे. तपासणीत 5070 रुग्ण आढळले त्यातील तब्बल 3615 जण हे प्रवासी मजूर होते.