

Police and locals gather at the shooting site in Siwan, Bihar, where a road rage incident led to the death of a young man
esakal
Bihar News: बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप नेते आणि माजी आमदार मनोज सिंह यांच्या कुटुंबियांवर बुधवारी रात्री हल्ला करण्यात करण्यात आला. या गोळीबारात आमदारांच्या पुतण्याचा मृत्यू झाला असून त्यांचे मेहुणे गंभीर जखमी झाले आहेत. हर्ष कुमार सिंह (वय २८) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे तर गंभीर जखमी झालेला मेहुणा चंदन सिंगवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन कारची धडक झाल्याच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तोही जखमी झाल्याचे माहिती समोर येत आहे.