
महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मंगळवारी राज्यातील 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचे 9-9 मंत्री सामील होते. इकडे बिहारमध्येही जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भारतीय जनता पार्टी (भाजप) यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
बिहारमधील राजकीय परिस्थितीवर काँग्रेस नेते नासिर हुसेन म्हणाले की, "निसर्गाने न्याय दिला आहे. महाराष्ट्रात भाजपने जसा कारभार केला तसाच प्रकार बिहारमध्ये होत आहे."
मुख्यमंत्री नितीश कुमार आज सायंकाळी चार वाजता राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेणार आहेत. राज्यपालांच्या भेटीसाठी त्यांनी वेळ मागितली होती. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटल्यानंतर आता बिहारमध्ये जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल यांच्या सहकार्याने नवीन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे. या सरकारला काँग्रेसने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे.
भाजपवर हल्लाबोल करताना नितीशकुमार म्हणाले की, त्यांनी नेहमीच त्यांचा अपमान केला. बिहारमधील नवीन सरकारबद्दल उपेंद्र कुशवाह यांनी नितीश यांचे आधीच अभिनंदन करताना म्हटले की, नितीश जी, पुढे जा, देश तुमची वाट पाहत आहे.