नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार? भाजपची साथ सोडून लालूंचा हात पकडायची तयारी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitish Kumar & PM Modi

नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार? भाजपची साथ सोडून लालूंचा हात पकडायची तयारी सुरू

बिहारमध्ये पुन्हा एकदा जेडीयू-भाजप युती तुटू शकते. एक-दोन दिवसांत जेडीयू भाजपपासून वेगळे होण्याची घोषणा करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आरजेडी, डावी आघाडी आणि काँग्रेससोबत पर्यायी सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

जेडीयू भाजपवर पक्ष फोडल्याचा आरोप करत आहे. नुकताच पक्षाचा राजीनामा देणाऱ्या आरसीपी सिंह यांच्यात पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जेडीयू करत आहे. एवढेच नाही तर नितीशकुमार यांच्या पक्षातील बहुतांश आमदारांना मध्यावधी निवडणुका नको आहेत. अशा परिस्थितीत नितीश कुमार आरजेडी, डावी आघाडी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापनेसाठी पर्याय शोधत आहेत.

'आरजेडी'नेही बोलावली बैठक

बिहारमधील राजकीय घडामोडी पाहता आरजेडी आमदारांची पाटणा येथे बैठक होणार आहे. जेडीयू-भाजप युतीबाबत सुरू असलेल्या अटकळांमध्ये ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत भाग घेण्यासाठी आरजेडीचे सर्व खासदार आज संध्याकाळपर्यंत पाटण्याला पोहोचतील.

'नितीश कुमार काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात'?

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क साधला आहे. मात्र, नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी थेट चर्चा केल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगण्यास नकार दिला. आरसीपी सिंह यांनी राजीनामा दिल्यापासून ते विरोधी पक्षात सक्रिय झाले आहेत. बिहार काँग्रेसचे प्रभारी भक्त चरण दास यांनी सांगितले की, स्वातंत्र्य दिनाशी संबंधित काँग्रेस पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी ते अधिकृतपणे टना येथे जात आहेत, त्याचबरोबर ते राज्यातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीवरही लक्ष ठेवणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपमध्ये ज्या प्रकारे संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यानंतर बिहारमध्ये एनडीएचे सरकार पडणार आणि नितीश पुन्हा आरजेडीसोबत सरकार स्थापन करणार, असे प्रश्न सातत्याने उपस्थित केले जात आहेत. वास्तविक, गेल्या 1 महिन्यातील घडामोडींवर नजर टाकली तर असे दिसते की, नितीश आणि भाजपमध्ये सर्व काही सुरळीत चाललेले नाही. नितीश कुमार यांनी भाजपचा गळा कापला आहे, असे एका महिन्यात 4 वेळा घडले आहे.

हेही वाचा: 'या जन्मातच काय, तर पुढच्या सात जन्मातही नितीश कुमार पंतप्रधान होऊ शकणार नाहीत'

नितीश यांनी एका महिन्यात भाजपपासून अंतर कसे ठेवले?

प्रथम, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली 17 जुलै रोजी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती, परंतु नितीश कुमार या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर 22 जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभात नितीश कुमार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, मात्र ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.

25 जुलै रोजी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नितीश कुमार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, मात्र ते गेले नाहीत.

७ ऑगस्ट रोजी नितीश कुमार यांना पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बोलावण्यात आले होते, मात्र ते या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

हेही वाचा: बिहारमध्ये राजकीय भूकंप येणार? लोकसभा निवडणुकीवर लालन सिंह म्हणाले...