संतापजनक! वन-वे रोडवर रिक्षा चालकाने अचानक यू-टर्न घेतला अन् तरुणाचा जीव गेला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

Biker Dies After E Rickshaw U Turn: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ऑटो चालकाच्या निष्काळजीपणामुळे एक अपघात घडला आहे.
accident Video
accident Video

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ऑटो चालकाच्या निष्काळजीपणामुळे एक अपघात घडला आहे. यावरुन लोकांनी संताप व्यक्त केला आहे. वन-वे रोडवरुन एका ई-रिक्षा चालकाने अचानक यू-टर्न घेतल्याने टू-व्हीलर चालकाचा हकनाक बळी गेला आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये हा अपघात कैद झाला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर (accident Video) व्हायरल होत असून लोकांचा संताप होत आहे.

धक्कादायक म्हणजे अपघात झाल्यानंतर ई-रिक्षाचालक तिथे न थांबता पसार झाला आहे. ब्रीजवरुन वाहतूक सुरु होती. त्यावेळी एक ई-रिक्षा चालक अचानक आपली ई-रिक्षा वळवतो. त्याच रस्त्यावरुन गतीने येणारा तरुण ई-रिक्षाला जोरात धडकतो अन् रस्त्यावर पडतो. त्याला गंभीर दुखापत होते. यावेळी ई-रिक्षाचालक मदतीला न थांबता तेथून पळ काढतो.

accident Video
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

मृत तरुणाचे नाव आकाश सिंह असून तो २१ वर्षाचा होता. अपघातानंतर त्याला काही प्रवाशांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. पण, हॉस्पिटलमध्ये जात असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आकाश सिंह याचे वडील अश्वनी सिंह यांच्या तक्रारीवरुन रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश एका खासगी कंपनीमध्ये काम करत होता. तो ऑफिसकडे निघाला होता. त्यावेळी ई-रिक्षा चालकाच्या चुकीमुळे त्याचा अपघात झाला अन् त्यातच त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेमुळे रिक्षा-चालकांचा मुजोरिपणा समोर आला आहे. आरोपी ई-रिक्षा चालक फरार आहे.

accident Video
Jalgaon Accident News : दुभाजकाला टायर घासल्याने फुटून अपघात; 6 प्रवासी जखमी

रिक्षा चालक उद्धट वागत असल्याचा अनुभव सर्वांनाच आला असेल. रिक्षा चालक एका गँगचे सदस्य असल्यासारखं वागत असतात. एखाद्याला देखील जाब विचारला तर ऑटो चालकांची संपूर्ण गँगच अंगावर येत असते. ऑटो चालक ट्रॅफिक नियम पाळत नाहीत, बिंधास्त ऑटो कोठेही शिरवतात. जवळ येऊन ब्रेक मारतात अशा प्रकारच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com