शेतातून निघाल्या कोट्यवधींच्या नोटा; गावकऱ्यांनी नेले चोरून

Billions of notes Found in Farm; Stolen by villagers
Billions of notes Found in Farm; Stolen by villagersBillions of notes Found in Farm; Stolen by villagers

पालीगंज : सिगोडी पोलिस ठाण्याच्या पासौदा गावातील बधर येथे बंद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. याची माहिती गावात पसरताच लोकांनी बधर येथे धाव घेतली. यावेळी नोटा उचलण्यासाठी शर्यत लागली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच ते तात्काळ पोहोचले. मात्र, तोपर्यंत सर्व नोटा नागरिकांनी उचलून नेले होते. (Billions of notes Found in Farm; Stolen by villagers)

पळसौदा गावातील बधर येथे शेतात नांगरणी सुरू होती. त्याचवेळी प्लॅस्टिकच्या गोणीत ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा सापडल्या. हे शेत गावातील अजय सिंग यांचे आहे. ट्रॅक्टर चालकाने ही माहिती गावातील लोकांना दिली. शेतात पैसे मिळाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांची गर्दी शेताकडे धावली. शेतात विखुरलेले पैसे पाहून लोकांमध्ये पैसे उचलण्यासाठी स्पर्धा लागली होती. अचानक सर्व नोटा गायब झाल्या. फक्त एक फाटलेली जुनी पोती उरली होती.

Billions of notes Found in Farm; Stolen by villagers
कर्नाटकात झाला हनुमानाचा जन्म; निवडणुकीपूर्वी भव्य मंदिराची योजना

याबाबत कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. सिगोडी पोलिस शेतात पोहोचेपर्यंत त्यांनी जमेल तेवढी रक्कम लुटली. गोणीत भरलेले पैसे कोट्यवधी होते, असे ग्रामस्थांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, असे सिगोडीचे एसएचओ मनोज कुमार यांनी सांगितले.

शेतात जुन्या नोटा कोठून आल्या आणि त्या कोणाच्या आहेत याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. सध्या पोलिसांकडून छापा टाकून पैसे घेऊन जाणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे, असे एसएचओ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com