Bird Flu Alert: अंडी-चिकन खाताना कोणती काळजी घ्याल? जाणून घ्या 10 मुद्दे

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 23 January 2021

भारतासह जगभरात आता बर्ड फ्लूची भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली - भारतासह जगभरात आता बर्ड फ्लूची भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अफवासुद्धा पसरत आहेत. यातच पोल्ट्री चिकन, अंडी खाणं सुरक्षित आहे की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. यामुळे चिकन आणि अंडी व्यवसायावरही परिणाम झाला आहे. दर पडल्यानं व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. 

काँग्रेसला नवा अध्यक्ष कधी आणि कोण? काय घडलं CWCच्या बैठकीत

FSSAI ने म्हटलं की 70 डिग्री सेल्सियसवर 3 सेकंदात हा व्हायरस नष्ट होते. जर मांस, अंडी 74 डिग्री सेल्सिअस तापमानात शिजवली तर बर्ड फ्लू व्हायरस मरून जातो. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक आणि ग्राहकांनी घाबरण्याची गरज नाही. लोकांनी योग्य पद्धतीने ही उत्पादने वापरायला हवीत. 

काय करावं आणि काय नको?

-अर्धवट शिजवलेली अंडी खाऊ नये
-चिकन शिजत असताना मधेच खाणं टाळावं
-संसर्ग झालेल्या भागातील पक्ष्यांच्या थेट संपर्कात येऊ नका
-मेलेल्या पक्षांना हाताळू नका
-कच्चे मटण रिकाम्या जागी ठेवू नये तसंच त्याला हातही लावू नये
-कच्चे मटण हाताळताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करा
-पुन्हा पुन्हा हात धुवा, आजुबाजुची जागा स्वच्छ ठेवा.
-चांगले आणि पूर्ण शिजलेले चिकन, अंडी खा

ममतादीदींना धक्क्यावर धक्के; आणखी एका कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा

FSSAI ने सांगितलं की मांस, अंडी योग्य पद्धतीने शिजवल्यास व्हायरस नष्ट होतात. संसर्ग असलेल्या भागातील उत्पादने कच्ची किंवा अर्धवट शिजलेली खाऊ नयेत. आतापर्यंत असं कोणतंही प्रकरण समोर आलेलं नाही की शिजवलेलं मांस किंवा अंडी खाल्ल्यानं बर्ड फ्लू पसरतो. इतकंच काय तर संसर्ग झालेल्या भागातून जरी मांस, अंडी आणलीत तरीही बर्ड फ्लू पसरल्याचं समोर आलेलं नाही. 

मांस आणि अंड्यांच्या वापराबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटंल आहे की, पोल्ट्रीतील चिकन आणि अंडी पूर्णपणे सुरक्षित आहेत. बर्ड फ्लू बद्दल अद्याप कोणती आकडेवारी नाही की ज्यातून अंडी, चिकनमुळे मानवी शरीरार फ्लू पसरल्याचे सांगता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird Flu Alert 10 points Warning issued by FSSAI over avian influenza virus