उत्तर प्रदेशातही ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव 

पीटीआय
Monday, 11 January 2021

बर्ड फ्लूचा संसर्ग आता उत्तर प्रदेशातही पोहोचला आहे. त्यामुळे कानपूर प्राणिसंग्रहालय सर्व सामान्‍यांसाठी बंद करण्यात आले आहे. तर, लखनौचे नवाब वाजिद अली प्राणी संग्रहालयात दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लखनौ - बर्ड फ्लूचा संसर्ग आता उत्तर प्रदेशातही पोहोचला आहे. त्यामुळे कानपूर प्राणिसंग्रहालय सर्व सामान्‍यांसाठी बंद करण्यात आले आहे. तर, लखनौचे नवाब वाजिद अली प्राणी संग्रहालयात दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कानपूर प्राणी संग्रहालयातील दोन पक्षी मृतावस्थेत आढळले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या पक्ष्यांना बर्ड फ्लूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या प्राणिसंग्रहालयाच्या एक किलोमीटर त्रिज्येचा परिसर हा ‘बाधित’ घोषित करण्यात आला आहे आणि या भागातील पक्ष्यांना मारण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती कानपूरचे अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी अतुल कुमार यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या पाच दिवसांत प्राणी संग्रहालयातील पाच पक्षी मृत्युमुखी पडले होते. त्यापैकी दोघांना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्राणी संग्रहालयाच्या परिसरातील कोंबड्या व त्यांची अंड्यांची विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोल्ट्रीच्या उत्पादनांच्या वाहतुकीवर आणि त्यांना शहरात आणण्यावर अनिश्‍चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी आलोक तिवारी यांनी सांगितले. प्राणीसंग्रहालयापासून एक किलोमीटर परिसरातील पोल्ट्री फार्मचे निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले आहे. 

सुसाइड नोट लिहित तरुणीनं घेतला गळफास; आरोपीवर 'लव्ह जिहाद'चा आरोप

लखनौच्या नवाब वाजिद अलि शाह प्राणिसंग्रहालयाचे संचालक आर. के. सिंह म्हणाले, ‘‘येथे बर्ड फ्लू आढळून आलेला नाही. परंतु, आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत. हा विषाणू परदेशी पक्ष्यांमार्फत येत असल्याने असे पक्षी येथे येऊ नयेत याची विशेष काळजी घेतली जात आहे.’

प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणा मिळाला? भारतीय वंशाच्या राष्ट्राध्यक्षांना मिळणार मान

अमेठीत कावळे मृत्युमुखी
अमेठीमध्ये संग्रामपूर भागात सहा कावळ्यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. या सगळ्या कावळ्यांना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird Flu Entry in Uttar Pradesh