देशात आता फक्त BIS Certified हेल्मेट; मोदी सरकारचा नवा आदेश

helmet.
helmet.

नई दिल्ली- आता बीआयएस सर्टिफिकेशन (BIS Certification) असणाऱ्याच हेल्मेटची विक्री आणि निर्मिती करता येणार आहे.  रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 1 जूननंतर देशामध्ये बिगर बीआयएस सर्टिफिकेशन हेल्मेटची विक्री केली जाऊ शकत नाही आणि याचे उल्लंघन गुन्हा मानले जाणार आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने हेल्मेट फॉर राईडर्स ऑफ टू व्हिलर्स मोटर (क्वालिटी कंट्रोल) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. 

इराणच्या टॉप अणु वैज्ञानिकाची हत्या; हल्ल्यामागे इस्त्राईलचा हात?

परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटलंय की, टू व्हिलर्ससाठीचे हेल्मेट बीआयएस सर्टिफिकेशन असल्यास फायदा होईल. यामुळे मोठ्या दुखापतीपासून बचाव करता येईल. भारतात लोकल हेल्मेट्स मोठ्या प्रमाणात विकले जातात. अनेकजण पैसे वाचवण्याच्या उद्देशाने कमी दर्जाचे हेल्मेट विकत घेतात, पण जेव्हा अपघात होतो अशावेळी हे हेल्मेट राईडरसाठी सुरक्षित ठरत नाहीत. त्यामुळे गंभीर दुखापत होई शकते. शिवाय राईडरचा जीव जाण्याचाही धोका असतो. 

हेल्मेट न वापरल्याने अनेकांचा जातो जीव

कमी दर्जाचे हेल्मेट वापरल्याने अनेक टू व्हिलर राईडर्सचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. एम्स ट्रॉमा सर्जरीचे प्रोफेसर डॉ अमित गुप्ता यांनी सांगितलं की, टू व्हिलर चालकांच्या होणाऱ्या अपघातातील जवळजवळ 45 टक्के दुखापत ही डोक्यासंबंधी असते. यातील 30 टक्के दुखापत गंभीर असते. यामुळे मृत्यू होण्याचा संभव असतो. याशिवाय मध्यम स्वरुपाच्या डोक्याच्या दुखापतीमुळेही मोठी हानी पोहोचू शकते.  

2019 मध्ये रस्ते अपघातातील 38 टक्के पीडित टू व्हिलर चालक आहेत. यानंतर ट्रक किंवा लॉरी (14.6%), कार (13.7%) आणि बस (5.9%) यांचा क्रमांक येतो. गृह मंत्रालयाअंतर्गत आकडेवारी गोळा करणारी संस्था NCRB च्या म्हणण्यानुसार, ओव्हरटेकिंग किंवा बेपर्वाईने वाहन चालवल्यामुळे 25.7 टक्के अपघात होतात. यामुळे 2019 मध्ये 42,557 मृत्यू झालेत तर 1,06,555 जखमी झाले आहेत. खराब वातावरणामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण 2.6 टक्के आहे. 

दरम्यान, रोड सेफ्टी संबंधी बनवण्यात आलेल्या एका समितीने 2018 मध्ये वजनाने हलके आणि गुणवत्तापूर्ण हेल्मेट बनवण्याची शिफारस केली होती. ही शिफारस रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने स्वीकारली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com