BJP claims on Rahul Gandhi-Video: ''राहुल गांधींच्या निवासस्थानी रचला गेला ‘AI’ समिटला बदनाम करण्याचा कट'' ; भाजपचा गंभीर आरोप!

BJP Alleges Conspiracy Linked to Rahul Gandhi’s Residence : युवक काँग्रेसने शर्ट काढून केलेल्या आंदोलनावर भाजपचा जोरदार हल्लाबोल ; जाणून घ्या, भाजप नेते संबित पात्रा काय म्हणाले?
BJP leaders allege a conspiracy linked to Rahul Gandhi’s residence aimed at defaming the AI Summit, sparking a fresh political controversy.

BJP leaders allege a conspiracy linked to Rahul Gandhi’s residence aimed at defaming the AI Summit, sparking a fresh political controversy.

esakal

Updated on

BJP claims on Congress :राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ दरम्यान, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे शर्ट काढून निषेध केला. या घटनेवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजप नेते संबित पात्रा म्हणाले की, हा एक जाणूनबुजून रचलेला कट होता.

भाजप नेते संबित पात्रा यांनी गंभीर आरोप केले की, काही निदर्शकांनी बारकोड घेऊन कार्यक्रमात प्रवेश केला आणि निषेध म्हणून त्यांनी टी-शर्ट उलटे घातले होते. पात्रांचा दावा आहे की, ही एक अचानक घडलेली घटना नव्हती, तर एक सुनियोजित कट होता. ही संपूर्ण घटना राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत राहुल गांधींच्या अधिकृत निवासस्थानी नियोजित करण्यात आली होती.

एवढंच नाहीतर भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले, "...ही योजना रस्त्यावरच्या एखाद्या युवा काँग्रेस नेत्याने आखली नव्हती. ती राहुल गांधींच्या निवासस्थानी, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्रा यांच्या उपस्थितीत आखण्यात आली होती. हा एक प्रयोग आहे, योगायोग नाही."

BJP leaders allege a conspiracy linked to Rahul Gandhi’s residence aimed at defaming the AI Summit, sparking a fresh political controversy.
VIDEO : युवक काँग्रेसचं टी-शर्ट काढून आंंदोलन, AI Summit मध्ये Ind-US ट्रेड डीलचा विरोध

दरम्यान, या समिटसाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांपासून संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आणि मोठ्या टेक कंपन्यांचे प्रमुख दाखल झाले आहेत. अनेकांनी या समिटचं कौतुक केलं आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही एआय समिट अत्यंत उत्कृष्ट असल्याचं म्हटलं आहे. मात्र, युवक काँग्रेसच्या कार्यर्त्यांनी या ठिकाणी पोहोचत आंदोलन केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com